• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these are the best alternatives to the popular chinese apps banned in india sas

CamScanner, टिकटॉकवरील बंदीचं ‘नो टेन्शन’, ही घ्या पर्यायी Apps ची लिस्ट

CamScanner, टिकटॉकवरील बंदीचं ‘नो टेन्शन’, ही घ्या पर्यायी Apps ची लिस्ट

Updated: September 10, 2021 14:27 IST
Follow Us
  • भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये TikTok, कॅमस्कॅनर, UC Browser, शेअरइट, क्लीन मास्टर यांसारख्या अनेक लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.
    1/20

    भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये TikTok, कॅमस्कॅनर, UC Browser, शेअरइट, क्लीन मास्टर यांसारख्या अनेक लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.

  • 2/20

    सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा TikTok,CamScanner,UC Browser, Shareit, Shein, Mi Community, Club Factory, Xender, Mi Video Call आणि WeChat यांना पर्यायी अ‍ॅप्स कोणते याबाबत सुरू आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही बेस्ट पर्यायी अॅप्सबाबत माहिती देत आहोत.

  • 3/20

    TikTok : बंदी घातलेल्या अॅप्समध्ये शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉकचा समावेश आहे. टिकटॉकसाठी प्लेस्टोअरवर काही भारतीय अॅप्सचे पर्याय उपलब्ध आहेत.

  • 4/20

    TikTokला पर्याय : Mitron आणि Chingari हे दोन्ही भारतीय अॅप असून यातील बहुतांश फीचर्स टिकटॉकप्रमाणेच आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये हे दोन्ही अॅप्स चांगलेच लोकप्रियही झाले आहेत.

  • 5/20

    UC Browser या ब्राउझरवरही सरकारने बंदी घातली आहे. UC Browser साठीही प्लेस्टोअरवर दोन चांगले पर्याय आहेत.

  • 6/20

    UC Browserला पर्याय : गुगल क्रोम आणि Mozilla Firefox हे दोन्ही ब्राउझर UC Browser पेक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि लोकप्रियही आहेत.

  • 7/20

    Shareit : फाइल ट्रांसफर करण्यासाठी अनेकजण शेअरइटचा वापर करतात पण त्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. शेअरइटला पर्याय म्हणूनही काही उत्तम पर्याय आहेत.

  • 8/20

    Shareitला पर्याय : अँड्रॉइड युजर्स Files Go चा Shareit ला पर्याय म्हणून वापर करु शकतात. या अॅपद्वारे फाइल मॅनेज आणि फोन स्टोरेज क्लीन-अप देखील करु शकतात. तर, iOS युजर्ससाठी बिल्ट इन एयरड्रॉप फंक्शन हा Shareit ला पर्याय आहे.

  • 9/20

    UCNews: न्यूजसाठी लोकप्रिय असलेल्या UCNews साठीही दोन चांगले पर्याय आहेत.

  • 10/20

    UCNews ला पर्याय : Inshorts आणि DailyHunt हे दोन अॅप्स UCNews ला पर्याय म्हणून वापरता येतील.

  • 11/20

    ES File Explorer फाइल मॅनेज करण्यासाठी अनेकजण या अॅपचा वापर करतात. या अॅपसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.

  • 12/20

    ES File Explorer ला पर्याय म्हणून file commander – file manager & free cloud या अॅपचा वापर करु शकतात.

  • 13/20

    Kwai, Helo, Likee, Bigo Live: या सर्व व्हिडिओ शेअरिंग अॅप्ससाठी तुम्ही Roposo या भारतीय अॅपचा वापर करु शकतात.

  • 14/20

    Baidu Maps ला सर्वोत्तम पर्याय म्हणजे Google Maps आहे. याशिवाय MapMyIndia याचाही वापर करता येईल.

  • 15/20

    Club Factory and Shein: बंदी घातलेल्या अॅप्समध्ये Club Factory आणि Shein या डिझाइनर कपड्यांच्या शॉपिंगशी संबधित अॅप्सचाही समावेश आहे.

  • 16/20

    Club Factory and Shein ला पर्याय: Myntra आणि Flipkart या दोन अॅप्सचा वापर तुम्ही यांना पर्याय म्हणून करु शकता.

  • 17/20

  • 18/20

    CamScanner: कॅमस्कॅनर अॅप भारतात बरंच लोकप्रिय असून अनेक ठिकाणी याचा वापर केला जातो. तुम्हीही कॅमस्कॅनर वापरत असाल तर चिंता करण्याचं कारण नाही, कारण कॅमस्कॅनरसाठीही काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

  • 19/20

    CamScanner ला पर्याय: Adobe Scan आणि Microsoft Office Lens हे दोन अॅप्स कॅमस्कॅनरला उत्तम पर्याय आहेत.

  • 20/20

    ही आहे बंदी घातलेल्या 59 Apps ची संपूर्ण यादी

Web Title: These are the best alternatives to the popular chinese apps banned in india sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.