• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. work from home long sitting hours here is how you can avoid health problems scsg

Work From Home मुळे दिवसभर बसून काम करताय? ‘हे’ व्यायाम नक्की करा

जाणून घ्या पोट सुटणे, कंबरदुखी आणि इतर त्रास टाळण्यासाठी कोणते व्यायाम करावेत

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • लॉकडाउन सुरु झाल्यापासून अनेकजण वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करत आहेत. मात्र त्यामुळे कामासाठी दिवसभर एका जागी बसून राहणाऱ्यांचे प्रमाण वाढले. दिवसातील ९ ते १० तास कॉम्प्युटरसमोर बसून काम करावे लागत आहे. पण दिवसभर एका जागी बसल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढतात. लठ्ठपणा, सांधे आखडणे अशा तक्रारी सुरु होतात. अशा तक्रारी भेडसावूच नयेत म्हणून काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. ज्यांना दिवसभर एका जागी बसावे लागते त्यांनी काही ठराविक व्यायाम केल्यास ते फायदेशीर ठरतात. पाहूयात कोणते आहेत हे व्यायामप्रकार… (सर्व फोटो प्रातिनिधिक)
    1/6

    लॉकडाउन सुरु झाल्यापासून अनेकजण वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करत आहेत. मात्र त्यामुळे कामासाठी दिवसभर एका जागी बसून राहणाऱ्यांचे प्रमाण वाढले. दिवसातील ९ ते १० तास कॉम्प्युटरसमोर बसून काम करावे लागत आहे. पण दिवसभर एका जागी बसल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढतात. लठ्ठपणा, सांधे आखडणे अशा तक्रारी सुरु होतात. अशा तक्रारी भेडसावूच नयेत म्हणून काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. ज्यांना दिवसभर एका जागी बसावे लागते त्यांनी काही ठराविक व्यायाम केल्यास ते फायदेशीर ठरतात. पाहूयात कोणते आहेत हे व्यायामप्रकार… (सर्व फोटो प्रातिनिधिक)

  • 2/6

    पोट सुटू नये म्हणून कोणता व्यायाम कराल? – पाठीवर झोपावे. त्यानंतर पाय गुडघ्यात वाकवून तळवे जमिनीला टेकलेले राहतील असे पहावे. हात वर ठेवावेत. डावा पाय आणि उजवा हात वर करुन एकमेकांना लावण्याचा प्रयत्न करावा. याचप्रमाणे उजवा पाय आणि डाव्या हाताने करावे. या व्यायामामुळे पोटाच्या स्नायूंना व्यायाम होऊन पोट वाढण्याची शक्यता कमी होते, तसेच वाढलेले असेल तर ते कमी होण्यास मदत होते.

  • 3/6

    कंबरेखालील त्रास टाळण्यासाठी काय कराल? पालथे होऊन हात कोपरापर्यंत टेकलेले ठेवा. पायाचे चवडे जमिनीला टेकलेले राहू द्या. कंबरेचा भाग वर-खाली करा. त्यामुळे शरीराच्या स्नायूंना व्यायान होऊन दिवसभर बैठे काम असेल तरीही त्याचा त्रास होणार नाही.

  • 4/6

    सतत बसूनही कंबरदुखी टाळायची असेल तर काय करावे? – पाठीवर झोपा, पाय गुडघ्यातून वाकवा. मात्र तळवे जमिनीला टेकलेले असू द्या. पाठ आणि तळवे टेकलेले ठेऊन कंबर जमिनीपासून वर उचला. यानंतर कंबर आणि एक पाय वर उचलूनही हा व्यायाम करु शकता. त्यामुळे कंबरेच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो.

  • 5/6

    सर्यनमस्कार सर्वात उत्तम – सूर्यनमस्कार हाही सर्वांगिण व्यायाम आहे. त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर किमान १२ सूर्यनमस्कार घातल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. स्नायू मोकळे होण्यास सूर्यनमस्काराचा उपयोग होतो.

  • 6/6

    शक्य झाल्यास हे करा – ज्यांना शक्य असेल त्यांनी जीम, योगा, झुंबा, अॅरोबिक्स, पोहणे अशा ठिकाणी नियमित गेल्यास त्याचाही शरीर बळकट आणि सुदृढ राहण्यासाठी नक्कीच फायदा होतो. त्यामुळे तुमचे काम बैठे असेल तरीही तुम्हाला त्याचा त्रास होत नाही.

Web Title: Work from home long sitting hours here is how you can avoid health problems scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.