-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून तज्ज्ञ मंडळी अनेकदा स्वच्छता राखण्याचा सल्ला देतात. अगदी घरातील गोष्टी सॅनिटायझरने साफ करण्यापासून ते अन्न पदार्थ खरेदी करतानाही काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. करोना विषाणूचा प्रादुर्भाव अन्न पदार्थांच्या माध्यमातून होत असल्याचा कोणताही सबळ पुरावा अद्याप सापडलेला नाही. मात्र महामारीच्या काळामध्ये विकत आणलेली फळं आणि भाज्या स्वच्छ धुवून खाणं गरजेचं आहे. याचसंदर्भात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) काही निर्देश आणि सूचना दिल्या आहेत. भाज्या आणि फळे घरी आणल्यावर त्या कशापद्धतीने स्वच्छ कराव्यात आणि काय काळजी घ्यावी याबद्दल एपएसएसएआयने ट्विटवरुन महत्वाचे सल्ले दिलेत ते काय आहेत जाणून घेऊयात…
-
फळे आणि भाज्या बाहेरुन घरी घेऊन आल्यानंतर त्या पिशव्यांसहीत वेगळ्या ठेवा. त्या थेट घरात घेऊन जाऊ नका.
-
फळे आणि भाज्या वाहत्या म्हणजेच नळाच्या पाण्याखाली धुवा आणि शक्य झाल्यास ५० पीपीएम क्लोरिनचा एक थेंब गरम पाण्यात टाकून त्या पाण्यात काही काळ हे बुडवून ठेवा.
-
पिण्याच्या पाण्यानेच फळं आणि भाज्या स्वच्छ धुवा.
-
फळं आणि भाज्यांवर जंतूनाशक, सॅनिटायझर आणि साबणाचा वापर करु नका.
-
ज्या भाज्या आणि फळं फ्रिजमध्ये ठेवण्यासारख्या आहेत त्या स्वच्छ धुतल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवून द्या. जी फळं आणि भाज्या (बटाट्यासारख्या गोष्टी) फ्रिजमध्ये ठेवत नाहीत त्या गोष्टी कोरड्या जागी ठेऊन द्या.
-
भाज्या कशा धुवाव्यात याचबरोबर भाज्या घेऊन आल्यानंतर काय काळजी घ्यावी यासंदर्भातही एपएसएसएआयने आठ महत्वाच्या सुचना केल्या आहेत. काय आहेत त्या जाणून घेऊयात…
-
चप्पल आणि बूट घालून घरात प्रवेश करु नका. दरवाजाच्या बाहेरच चप्पल बूट काढूनच घरात प्रवेश करा.
-
भाज्या आणि फळं आणण्यासाठी नेलेल्या पिशव्या वेगळ्या ठेवा. जमल्यास त्यांच्यासाठी एक स्वतंत्र जागा बनवा. दरवेळी त्याच पिशव्या वापरा आणि कापडी पिशव्या असतील तर वरचे वर त्या स्वच्छ धुवा.
-
घरात प्रवेश केल्यानंतर लगेच हात स्वच्छ धुवा. शक्य असल्यास दरवाजाजवळच सॅनिटायझर किंवा हात धुण्याची व्यवस्था असल्यास हात धुवूनच घरात प्रवेश करा.
-
हात धुतल्यानंतर सर्वात आधी अंगावरील कपडे बदला. घरातील कपडे घाला. तसेच बाहेर घालून गेलेली कपडे धुण्यासाठी टाका.
-
हात धुवून, कपडेबदलून झाल्यानंतरच पिशव्यांमधील भाज्या आणि फळं बाहेर काढा.
-
फळं आणि भाज्या जास्त काळ दरवाजाबाहेर राहणार नाहीत याची काळजी घ्या. होम डिलेव्हरी करताना अनेकदा भाज्या बराच काळ घराच्या दरवाजाजवळच राहतात. भाज्या आणि फळं गाडीत विसरु नका. भाज्या जास्त काळ बाहेर ठेवल्यास त्याच्यावर वातावरणाचा परिणाम होतो तसेच किड लागण्याची शक्यता असते.
-
भाज्या आणि फळांवर प्लॅस्टीकचे आवरण असेल तर ते सॅनिटायझर आणि जंतूनाशकांनी स्वच्छ करा आणि मगच फळे आणि भाज्या बाहेर काढा.
-
भाज्या आणि फळं ज्या बेसीनमध्ये धुतली आहेत ते बेसीनही स्वच्छ धुवा.
FSSAI guidelines: भाज्या घरी आणल्यावर कशा स्वच्छ कराव्यात?; खरेदी करुन घरी आल्यावर काय काय करावे?
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने दिल्या १३ महत्वाच्या सूचना
Web Title: Fssai guidelines for cleaning fruits and vegetables the right way scsg