-
लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस ब जीवनसत्त्व प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ हे सर्व पोषक घटक दुधी भोपळ्यामध्ये असतात. आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा पित्तशामक व कफनाशक, हृदय, मूत्रल, सप्तधातूंचे पोषण करणारा व बलकारक आहे.
-
दुधी भोपळ्यामध्ये कमी उष्मांक असल्याकारणाने तो हृदयरोग्यांसाठी एक वरदानच ठरला आहे. हृदयविकारामध्ये रक्त वाहिन्यांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल साठून रक्तपुरवठा सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा वेळी रोज सकाळी अर्धा कप दुधी भोपळ्याचा रस, तुळशीची ७-८ पाने, पुदिन्याची ७-८ पाने, संधव, जिरे व काळी मिरी एकत्र करून रोज सकाळी हा रस प्यावा. यामुळे रक्तवाहिन्यांवरील अडथळा दूर होऊन रक्तपुरवठा सुरळीत होतो.
-
दुधी भोपळा हा धातुपुष्टीकर असल्याकारणाने गर्भवती स्त्रीने आहारामध्ये दुधीचे सेवन नियमित करावे. यामुळे गर्भवतीचे आरोग्य चांगले राहून गर्भाचे पोषणही व्यवस्थित होते. तसेच गर्भावस्थेमध्ये वारंवार होणारा मलावष्टांभाचा त्रासही दूर होतो.
-
स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप प्यावे. या सूपाला संधव, जिरे, हळद, मीठ व गाईच्या तुपाची फोडणी द्यावी. यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते व शरीरास सर्व पोषक घटकही मिळतात.
-
शांत झोप येत नसेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याच्या रसाने तयार केलेले तेल डोक्याला व तळपायाला लावावे. हे तेल बनविताना दुधी भोपळ्यासोबत त्याची पाने व फुलेही घ्यावीत. या तेलामुळे थंडावा निर्माण होऊन शांत झोप लागते.
-
अति उष्णता, जुलाब, आम्लपित्त, मधुमेह, अति तेलकट खाणे यामुळे जर वारंवार तहान लागत असेल, तर अशा वेळी ग्लासभर दुधीचा रस चिमूटभर मीठ घालून घ्यावा. यामुळे घामातून शरीराबाहेर जाणारे क्षार कमी होतात. तहान लागणे कमी होते व थकवा जाणवत नाही.
-
आजारपणामुळे अशक्तपणा जाणवत असेल व शरीर कृश झाले असेल, तर अशा वेळी दुधी भोपळ्याचा हलवा हा खडीसाखर, वेलदोडे, दूध, बदाम, मनुके घालून जेवणानंतर खावा. यामुळे काही दिवसांतच शरीराचा अशक्तपणा दूर होतो.
-
खूप ताप आला असेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याचे सूप पिणे हे एक उत्तम औषध ठरते. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते. तसेच ताप चढत असल्यास दुधी किसून कपाळावर लेप लावावा. असे केल्याने ताप उतरण्यास मदत होते.
-
अति उष्णतेमुळे डोळ्यांची आग होत असेल तसेच डोळ्यांची लाली वाढली असेल, तर अशा वेळी दुधीचा कीस कापसावर ठेवून तो कापूस डोळ्यांवर ठेवावा व शांतपणे पडून राहावे. यामुळे डोळ्यांची उष्णता कमी होते.
-
अति काळजीने मेंदूचा ताणतणाव वाढला असेल व त्यातून असहय़ तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर अशा वेळी १ कप दुधीचा रसामध्ये १ चमचा मध घालून घ्यावा. यामुळे डोकेदुखी थांबते.
-
पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पित्ताचा तसेच उष्णतेचा त्रास होत असेल तर नियमितपणे आहारातून दुधीचे सेवन करावे. यामुळे शरीराला शीतलता प्राप्त होते.
-
दुधीचे बी औषध म्हणून उपयुक्त आहे. या बिया दुधात वाटून घेतल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढून विस्मरण कमी होते. तसेच मस्तकातील उष्णता कमी होऊन मेंदूचा उत्साह वाढतो.
-
उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही होत असेल तर दुधीचा रस खडीसाखर घालून प्यावा. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो.
-
लघवीला जळजळ होत असेल तर अशा वेळी ग्लासभर दुधीरस त्यामध्ये अध्रे िलबू पिळून घ्यावे. यामुळे मूत्रातील अतिरिक्त आम्लाचे प्रमाण कमी होते व साहजिकच शरीराची उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.
-
तळपायांना भेगा पडल्या असतील, तर अशा वेळी दुधीने सिद्ध केलेले तेल तळपायांना लावून पायात मोजे घालावे. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होऊन भेगा भरून येतात.
-
आहारामध्ये नियमितपणे दुधीचा वापर करावा. अनेक जणांना तसेच लहान मुलांना दुधीची भाजी खाण्यास आवडत नाही. अशा वेळी कोिशबीर, थालीपीठ, पराठा, हलवा, सूप अशा अनेक स्वरूपांत दुधी भोपळ्यापासून पदार्थ बनवून
दुधी भोपळा खाण्याचे ‘हे’ आहेत १६ फायदे
Web Title: Health benefits of doodhi lauki bottle gourd asy