• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. oneplus nord open sale begins on august 4 at amazon check price specifications and offers sas

स्वस्त ‘वनप्लस नॉर्ड’ आता Open Sale मध्ये, जिओ युजर्सना 6,000 रुपयांपर्यत ‘बेनिफिट्स’ची ऑफर

‘अ‍ॅमेझॉन इंडिया’च्या वेबसाइटवर ‘ओपन सेल’ला होणार सुरूवात

August 2, 2020 17:21 IST
Follow Us
  • गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'स्वस्त' OnePlus Nord हा नवीन स्मार्टफोन आता 'ओपन सेल'मध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने या फोनसाठी काही दिवसांपूर्वी प्री-बूकिंग सुरू केली होती, त्यानंतर OnePlus Nord हा फोन अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये 6 आणि 7 ऑगस्ट रोजी खरेदीसाठी उपलब्ध होईल अशी चर्चा होती. पण आता हा फोन त्याआधीच ओपन सेलमध्ये उपलब्ध होणार आहे.
    1/

    गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'स्वस्त' OnePlus Nord हा नवीन स्मार्टफोन आता 'ओपन सेल'मध्ये खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. कंपनीने या फोनसाठी काही दिवसांपूर्वी प्री-बूकिंग सुरू केली होती, त्यानंतर OnePlus Nord हा फोन अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये 6 आणि 7 ऑगस्ट रोजी खरेदीसाठी उपलब्ध होईल अशी चर्चा होती. पण आता हा फोन त्याआधीच ओपन सेलमध्ये उपलब्ध होणार आहे.

  • 2/

    अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर OnePlus Nord च्या 'ओपन सेल'ला सुरूवात होणार असून कंपनीने फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही ठेवल्या आहेत.

  • 3/

    वन प्लसने गेल्या आठवड्यात 21 जुलै रोजी आपला हा स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला. यासोबतच कंपनीने अनेक दिवसांनंतर 'मिड-रेंज सेगमेंट'मध्ये पुनरागमन केलं.

  • 4/

    कंपनीने OnePlus Nord हा फोन तीन व्हेरिअंटमध्ये आणला असला तरी, सध्या OnePlus Nord च्या केवळ 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅम व्हेरिअंटचीच विक्री होणार आहे.

  • 5/

    तर, 6 जीबी रॅम मॉडेलची विक्री भारतात सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. पण अद्याप नेमकी तारीख समोर आलेली नाही.

  • 6/

    OnePlus Nord मध्ये सेल्फीसाठी 32+8 मेगापिक्सेलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये सोनी आयएमएक्स 616 सेन्सर आहे.

  • 7/

    तर, फोनच्या मागील बाजूला 48MP प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. 48MP प्राइमरी कॅमेऱ्याशिवाय 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.

  • 8/

    वनप्लस नॉर्डमध्ये अल्ट्राशॉट एचडीआर, नाइटस्केप, सुपर मॅक्रो, पोर्ट्रेट, प्रो-मोड, पॅनोरमा, एआय सीन डिटेक्शन, RAW इमेज आणि अल्ट्रा वाइड सेल्फी यांसारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचीही क्षमता आहे.

  • 9/

    ब्लू मार्बल आणि ग्रे ऑक्सी या दोन कलर्सचे पर्याय या फोनसाठी आहेत.

  • 10/

    ड्युअल-सिम कार्डचा सपोर्ट असलेला OnePlus Nord अँड्रॉइड 10 वर आधारित OxygenOS 10.5 वर कार्यरत आहे. यात 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) फ्लुइड एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765जी प्रोसेसर आणि 12 जीबीपर्यंत रॅम आहे.

  • 11/

    184 ग्रॅम इतकं या फोनचं वजन असून फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4,115mAh क्षमतेची बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे.

  • 12/

    कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्लुटूथ 5.1, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप-सी पोर्ट यांसारखे फीचर्स आहेत.

  • 13/

    या फोनसोबत कंपनी अनेक दिवसांनंतर मिड-रेंज सेगमेंटमध्ये पुनरागमन केलं आहे. तीन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. OnePlus Nord च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत भारतीय बाजारपेठेत 24 हजार 999 इतकी आहे.

  • 14/

    तर, 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत अनुक्रमे 27 हजार 999 रूपये आणि 29 हजार 999 रूपये इतकी आहे.

  • 15/

    जाणून घेऊया OnePlus Nord ओपन सेलबाबत :- चार ऑगस्टपासून Amazon.in वर हा फोन ओपन सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. यासोबतच फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. अमेरिकन एक्स्प्रेस कार्डद्वारे हा फोन खरेदी करणाऱ्यांना 2,000 रुपये कॅश डिस्काउंटची ऑफर आहे. याशिवाय, प्रमुख बँकांच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डवर सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट इएमआयचा पर्याय ग्राहकांना मिळेल. यासोबतच, OnePlus Nord खरेदी करणाऱ्या रिलायन्स जिओच्या ग्राहकांना 6000 रुपयांपर्यंतचे विविध प्रकारचे फायदे (बेनिफिट्स) मिळतील, असे अ‍ॅमेझॉनच्या वेसबाइटवर नमूद केले आहे.

Web Title: Oneplus nord open sale begins on august 4 at amazon check price specifications and offers sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.