-
देशातील अनेक वाहन उत्पादक कंपन्या एक जानेवारीपासून आपल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची किंमत वाढवणार आहेत.
-
मात्र तुम्ही आता गाडी घेण्याचा विचार करत असला आणि तुमचं बजेट जरा कमी असेल तर तुमच्याकडे वेळही अगदी कमी आहे हे ही तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल.
-
त्यामुळेच आम्ही तुमच्या मदतीला धावून आलो आहोत. या गॅलरीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हिरो मोटोकॉर्प, बजाज आणि टीव्हीएस कंपनीच्या काही स्वस्तात मस्त पर्यायांची माहिती देणार आहोत. (फाइल फोटो, पीटीआय)
-
हा सर्व गाड्या तुम्ही अगदी ५० हजारांच्या बजेटमध्ये विकत घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात या बजेट टू व्हिलर्सबद्दल.
-
बजाज सीटी १०० (Bajaj CT 100) – बजाज कंपनीच्या या गाडीचे दोन व्हेरिएंट म्हणजेच दोन मुख्य मॉडेल बाजरात आहेत. यामधील पहिलं मॉडेल हे किक स्टार्टवालं असून दुसरं इलेक्ट्रीक स्टार्टवालं आहे.
-
बजाज सीटी १०० मध्ये १०२ सीसीचं इंजिन देण्यात आलं असून ते ७.९ पीएसची पॉवर आणि ८.३४ एनएमचा टॉर्क निर्माण करतं. या गाडीचा सर्वाधिक वेग हा ९० किमी प्रती तास इतका आहे. गाडीचं मायलेज ८९.५ किलोमीटर प्रती लिटर इतकं आहे. गाडी ९० किमी प्रती लिटर इतकं मायलेज देते.
-
बजाज सीटी १०० च्या दोन्ही व्हेरिएंटपैकी किक स्टार्टवाल्या गाडीची किंमत ४१ हजार २९३ रुपये इतकी असून इलेक्ट्रीक स्टार्टवाल्या गाडीची किंमत ४८ हजार ९७३ रुपये इतकी आहे. बजाज सीटी १०० ही बाईक कंपनीच्या सर्वाधिक मायलेज देणाऱ्या दुचाकींपैकी एक आहे.
-
हिरो एचएफ डुलेक्स (Hero HF Deluxe) – हिरो एचएफ डुलेक्समध्ये कंपनीने ९७.२ सीसीचे इंजिन दिलं असून ते ८ पीएसची पॉवर तर ८.०५ एनएमचा टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे.
-
कंपनीने हिरो एचएफ डुलेक्स बाईकमध्ये आय थ्री एस तंत्रज्ञान दिलं आहे. यामुळे पेट्रोलची बचत होते आणि गाडी चांगलं मायलेज देते. गाडीचं मायलेज ६५ किलोमीटर प्रती लिटर इतकं आहे. या गाडीचा सर्वाधिक वेग हा ९० किमी प्रती तास इतका आहे.
-
हीरो मोटोकॉर्पच्या एचएफ डुलेक्स बाईकची किंमत आहे ४७ हजार ८०० रुपये.
-
बजाज प्लॅटिना १०० (Bajaj Platina 100) – बजाज प्लॅटिनामध्ये कंपनीने १०२ सीसीचं इंजिन दिलं आहे. गाडीचे इंजिन ७.९ पीएस पॉवर निर्माण करु शकतं. तर गाडीचा टॉर्क ८.३४ एनएम इतका आहे.
-
प्लॅटिनामध्ये बजाजने फोर स्पीड गेअरबॉक्स दिला आहे. गाडीचा सर्वाधिक वेग ९० किमी प्रती तास इतका आहे. गाडीचं मायलेज ७७ किलोमीटर प्रती लिटर इतकं आहे.
-
बजाज प्लॅटिना १०० ची किंमत आहे ४७ हजार ७६३ रुपये.
-
टीव्हीएस स्पोर्ट्स ( TVS Sport ) – टीव्हीएस कंपनीच्या या बाकईची किंमत ५० हजारांपेक्षा किंचित जास्त आहे. मात्र या बाईकच्या वैशिष्ट्यांमुळे तिचा या यादीमध्ये समावेश केला आहे. थोडं बजेट वाढवलं तर तुम्हाला या बाईकच्या रुपाने एक चांगली डील मिळू शकते.
-
टीव्हीएस स्पोर्ट्समध्ये कंपनीने १०९.७ सीसीचं इंजिन दिलं असून ते ८.१८ बीएचपी इतकी पॉवर निर्माण करतं. गाडीचा टॉर्क ७.५ एनएम इतका आहे. किक आणि सेल्फ स्टार्ट असे दोन्ही पर्याय टीव्हीएस स्पोर्ट्समध्ये देण्यात आलेले आहेत.
-
टीव्हीएस स्पोर्ट्सचा सर्वाधिक वेग हा ९० किमी प्रती तास इतका आहे. गाडीचे मायलेज ७७ किलोमीटर प्रती लिटर इतकं आहे. गाडीची किंमत ५२ हजार ५०० रुपये इतकी आहे.
५० हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत या बाईक्स; नवीन वर्षात किंमत वाढणार असल्याने आताच घ्या निर्णय
जाणून घ्या या बाईक्सची किंमती, फिचर्स आणि मायलेजबद्दल
Web Title: Best bikes under 50000 rs in india 2020 features mileage and cost scsg