Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tata safari bookings officially open at rs 30000 launch and delivery will start on february 22 sas

बहुप्रतिक्षित New Tata Safari : ‘या’ तारखेपासून डिलिव्हरी होणार सुरू, 30 हजारांत बूकिंगला झाली सुरूवात

Tata ची आयकॉनिक एसयूव्ही, Safari नावासोबत Harrier Returns!

Updated: September 9, 2021 00:36 IST
Follow Us
  • टाटा मोटर्सची (Tata Motors) बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari साठी अखेर आजपासून (दि.४) बूकिंगला सुरूवात झाली आहे.
    1/15

    टाटा मोटर्सची (Tata Motors) बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप एसयूव्ही Tata Safari साठी अखेर आजपासून (दि.४) बूकिंगला सुरूवात झाली आहे.

  • 2/15

    टाटा मोटर्सच्या देशातील कोणत्याही अधिकृत डिलरशीपमध्ये या एसयूव्हीसाठी ३० हजार रुपयांमध्ये बूकिंग करता येईल. बूकिंग अमाउंट रिफंडेबल असणार आहे.

  • 3/15

    नवीन टाटा सफारी सहा विविध व्हेरिअंट्समध्ये लाँच केली जाणार आहे. यात XE, XM, XT, XT+, XZ, XZ+ या सहा व्हेरिअंट्सचा समावेश असेल.

  • 4/15

    नवीन सात आसनी टाटा सफारी एकप्रकारे 'टाटा हॅरियर'चं नवीन व्हर्जन असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे.

  • 5/15

    नवीन टाटा सफारी कधी लाँच होणार आणि कधीपासून ग्राहकांना डिलिव्हरी देण्यास सुरूवात होणार याबाबतही कंपनीने माहिती दिली आहे. आधी जाणून घेऊया कशी आहे नवीन टाटा सफारी :

  • 6/15

    टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही आहे. टाटा मोटर्सने प्रजासत्ताक दिनी नवीन सफारीवरुन पडदा हटवला होता. पुण्यातील प्लांटमध्ये या एसयूव्हीचं प्रोडक्शन सुरू आहे.

  • 7/15

    सफारी हा टाटाचा एक मजबूत आणि प्रतिष्ठित ब्रँड असून देशातील ग्राहकांनी दोन दशकांहून अधिक काळ या एसयूव्हीला पसंती दिली आहे.

  • 8/15

    इंजिन : नवीन टाटा सफारीत 2.0 लिटर, 4-सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळेल. हे इंजिन 170 BHP पॉवर आणि 350 Nm टॉर्क निर्माण करतं. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स असेल. याशिवाय इको, सिटी आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड असतील. तसेच, तीन ESP टेरेन रिस्पॉन्स मोड- (नॉर्मल, रफ आणि वेट Normal, Tough and Wet) देखील या एसयूव्हीमध्ये आहेत.

  • 9/15

    या एसयुव्हीचा नवीन अवतार अधिक दमदार आहे. नवीन सफारीची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी ही वैशिष्ट्ये या एसयूव्हीला पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवतात.

  • 10/15

    नवीन Tata Safari मध्ये कंपनीने “OMEGARC” (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture)प्लॅटफॉर्मचा वापर केलाय. जो लँड रोव्हर च्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे.

  • 11/15

    टाटाच्या नवीन सफारीची इंटिरिअर थीम Oyster White रंगात असून कंपनी यासोबत Ash Wood डॅशबोर्डही देत आहे. तसेच कंपनीने व्हील आणि फ्रंटसाईडवर क्रोम फिनिश लूक दिला आहे.

  • 12/15

    नवीन सफारीत नवीन एक्सटिरियर पेंट पर्याय, नवीन अलॉय व्हील्स, आतल्या बाजूला सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, तीन-स्पोक स्टिअरिंग व्हील्स आहे.

  • 13/15

    , अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार-प्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रेकग्नायजेशन, 7-इंचाचा इंस्ट्रूमेंट पॅनल असेल. याशिवाय गाडीमध्ये तपकिरी रंगाची लेदर सीट आणि जेबीएल स्पीकर्सही असतील.

  • 14/15

    भारताच्या ऑटो मार्केटमध्ये टाटा सफारीची टक्कर नवीन जनरेशन Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांसारख्या एसयूव्हींसोबत असेल

  • 15/15

    डिलिव्हरी आणि किंमतीचा खुलासा कधी? : २२ फेब्रुवारी रोजी नवीन सफारी लाँच केली जाईल, आणि याच दिवशी सफारीच्या डिलिव्हरीलाही सुरूवात होणार आहे. नवीन सफारीच्या किंमतीबाबतही २२ फेब्रुवारी रोजीच खुलासा केला जाईल. आजपासून(दि. ४) या एसयूव्हीसाठी ३० हजार रुपयांमध्ये प्री-ऑर्डर सुरू झाली असून बूकिंग अमाउंट रिफंडेबल असणार आहे. भारताच्या ऑटो मार्केटमध्ये टाटा सफारीची टक्कर नवीन जनरेशन Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांसारख्या एसयूव्हींसोबत असेल, त्यावरुन 15 ते 24 लाख रुपयांदरम्यान या 7 सीटर एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत असण्याची दाट शक्यता आहे.

TOPICS
टाटा मोटर्सTata Motors

Web Title: Tata safari bookings officially open at rs 30000 launch and delivery will start on february 22 sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.