• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. the facelifted toyota fortuner and legender has already crossed 5k bookings within a month sas

‘टोयोटा’च्या नवीन Fortuner आणि Legender चा ‘जलवा’, लाँचिंगच्या एका महिन्यामध्येच तब्बल…

लाँचिंगला महिनाही पूर्ण झालेला नसताना नवीन Toyota Fortuner चा ‘जलवा’…

Updated: September 9, 2021 00:35 IST
Follow Us
  • देशातील प्रमुख कार कंपनी टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सने (Toyota Kirloskar Motor ) भारतीय बाजारात गेल्या महिन्यातच आपली लोकप्रिय लग्जरी एसयूव्ही Toyota Fortuner फेसलिफ्ट आणि फॉर्च्यूनरसाठी एक सुप्रीम व्हेरिअंट Toyota Legender लाँच केली होती. कंपनीच्या या दोन्ही एसयूव्हींबाबत ग्राहकांमध्ये चांगलीच 'क्रेझ' बघायला मिळतेय.
    1/15

    देशातील प्रमुख कार कंपनी टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सने (Toyota Kirloskar Motor ) भारतीय बाजारात गेल्या महिन्यातच आपली लोकप्रिय लग्जरी एसयूव्ही Toyota Fortuner फेसलिफ्ट आणि फॉर्च्यूनरसाठी एक सुप्रीम व्हेरिअंट Toyota Legender लाँच केली होती. कंपनीच्या या दोन्ही एसयूव्हींबाबत ग्राहकांमध्ये चांगलीच 'क्रेझ' बघायला मिळतेय.

  • 2/15

    गेल्या महिन्यात सहा जानेवारी रोजी कंपनीने या दोन्ही एसयूव्ही लाँच केल्या होत्या. म्हणजे लाँचिंगला अद्याप एक महिनाही पूर्ण झालेला नाही. पण त्याआधीच मार्केटमध्ये या दोन्ही एसयूव्हीची 'डिमांड' वाढली आहे.

  • 3/15

    लाँचिंगला महिनाही पूर्ण झालेला नसताना या एसयूव्हीसाठी तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त जणांनी बूकिंग केलं आहे. यात Toyota Legender चाही समावेश आहे. कंपनीकडून चार फेब्रुवारी रोजी याबाबत माहिती देण्यात आली.

  • 4/15

    या दोन्ही नवीन एसयूव्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासही सुरूवात झाली असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

  • 5/15

    "आम्ही दोन्ही एसयूव्ही ग्राहकांकडून मिळालेल्या फिडबॅकच्या आधारे बनवल्या होत्या, त्यामुळेच ग्राहकांचा इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे", असं कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नवीन सोनी यांनी सांगितलं.

  • 6/15

    नवीन फॉर्च्यूनर आधीच्या तुलनेत जास्त पॉवरफुल, स्पोर्टी आणि जबरदस्त फीचर्ससह आली आहे.

  • 7/15

    2021 Toyota Fortuner Facelift Look Features : टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्ट लूक आणि डिझाइनमध्ये खूपच आकर्षक आहे. या फूल साइज एसयूव्हीमध्ये नवीन हेडलँप, नवीन एलईडी टेललँप, 18 इंचाचे नवीन अलॉय व्हील्ज, मोठे फ्रंट ग्रिल आणि नवीन रिअर बंपर आहेत.

  • 8/15

    अन्य फिचर्स : नव्या फॉर्च्यूनर फेसफिल्टमध्ये कंपनीने 8.0 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. ही सिस्टीम स्मार्ट कनेक्टेड फिचर्शशिवाय अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो प्लेला सपोर्ट करते. गाडीमध्ये सीट व्हेंटिलेशन सिस्टीम, 11 स्पीकर प्रीमियम जेबीएल देखील आहे. नव्या फॉर्च्यूनरमध्ये Eco, Normal आणि Sport असे 3 रायडिंग मोडचे पर्याय आहेत. अनेक कनेक्टेड फिचर्सही यामध्ये आहेत.

  • 9/15

    एकूणच नवीन फॉर्च्यूनरमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आलेत. त्यामुळे ही गाडी आधीच्या तुलनेत जास्त आकर्षक आणि आक्रमक दिसतेय.

  • 10/15

    2021 Toyota Fortuner Facelift Engine : टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टमध्ये 2.8 लीटर टर्बो डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 204bhp पॉवर आणि 500Nm पर्यंत टॉर्क निर्माण करतं. यापूर्वी हे इंजिन केवळ 177 bhp पॉवर आणि 450 Nm टॉर्क निर्माण करायचं. म्हणजेच आधीच्या तुलनेत नवीन फॉर्च्यूनर फेसलिफ्टमधील इंजिन जास्त पॉवरफूल आहे.

  • 11/15

    याशिवाय कंपनीने 2021 Toyota Fortuner Facelift ला 2.7 लीटर पेट्रोल इंजिनमध्येही लाँच केलंय. हे इंजिन 166bhp ची पॉवर जनरेट करतं. या एसयूव्हीसाठी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रांसमिशनचे पर्याय आहेत.

  • 12/15

    Fortuner Legender : टोयोटाने भारतीय रस्ते आणि लोकांच्या आवडीचा विचार करुन टोयोटा फॉर्च्यूनरसाठी जास्त स्पोर्टी आणि एक सुप्रीम व्हेरिअंट Toyota Legender देखील लाँच केले आहे. लूक आणि फिचर्समध्ये Fortuner Legender जबरदस्त असून यामध्ये ग्राहकाच्या कम्फर्ट लेवलवर विशेष लक्ष देण्यात आलंय. कनेक्टेड फिचर्स व वायरलेस चार्जिंगसारखे अनेक फिचर्स यामध्ये आहेत.

  • 13/15

    Fortuner Legender किंमत : फॉर्च्यूनर लिजेंडर 4×2 ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची एक्स-शोरुम किंमत 37.58 लाख रुपये आहे.

  • 14/15

    टोयोटा फॉर्च्यूनर डिझेल व्हेरिअंट किंमत : टोयोटा फॉर्च्यूनर डिझेल व्हेरिअंट मॅन्यूअल ट्रान्समिशनची एक्स-शोरुम किंमत 35 लाख 14 हजार रुपये तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची किंमत 37 लाख 43 हजार रुपये आहे.

  • 15/15

    टोयोटा फॉर्च्यूनर पेट्रोल व्हेरिअंट किंमत : टोयोटा फॉर्च्यूनर पेट्रोल व्हेरिअंट मॅन्यूअल ट्रान्समिशनची एक्स-शोरुम किंमत 29 लाख 98 हजार रुपये आहे. तर या कारची ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कारची किंमत 31 लाख 57 हजार रुपये आहे. म्हणजेच नवीन टोयोटा फॉर्च्यूनरची बेसिक एक्स-शोरुम किंमत 29 लाख 98 हजार रुपये आहे. (सर्व फोटो – toyotabharat.com )

Web Title: The facelifted toyota fortuner and legender has already crossed 5k bookings within a month sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.