• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. valentines day special 2021 happy rose day importance and significance of rose colors ssj

Rose Day 2021 : लाल की गुलाबी? प्रेम व्यक्त करताना नेमकं कोणतं फूल द्यायचं?

Updated: September 9, 2021 00:35 IST
Follow Us
    • फेब्रुवारी महिना सुरु झाला की तरुणाईला वेध लागतात ते व्हेलेंटाइन डे चे. पण या दिवसाचं सेलिब्रेश करण्यापूर्वी साधारण आठवडाभर तरुणाई वेगवेगळे डे साजरे करत असतात. त्यातलाच आज पहिला दिवस म्हणजेच रोझ डे.
    • प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गुलाबाच्या फुलाला तसं फार महत्त्वं आहे. प्रेमाच्या प्रवासात जितकी वळणं येतात, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक गुलाबाच्या रंगाचंही आपलं असं एक वेगळं अस्तित्व आहे.
    • त्यामुळे यंदा जर तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला मनातल्या भावना सांगणार असला तर तिला गुलाबचं फूल नक्की द्या. पण त्यापूर्वी या फुलांच्या रंगाचं नेमकं महत्त्व काय आहे हे जाणून घेतलंच पाहिजे.
    • गुलाबी गुलाब : प्रेमात पडणं काही सोपं नसतं भाऊ. त्यासाठी डेरिंग लागते. त्यामुळे प्रेमात पडण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी समजून घेणं गरजेचं असतं. पण तुम्हाला जर त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी माहित नसतील तर? काळजी करायची गरज नाही, अशा वेळी थेट गुलाबाचं फूल देऊन टाकायचं. ‘मला तुझ्याविषयी आणखी जाणून घ्यायचं आहे’ हा संदेश समोरच्यापर्यंत बिनचूक पोहोचेल.
    • लाल गुलाब : लाल रंगाच्या फुलाविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण, लाल गुलाबचं महत्त्व साऱ्यांनाच ठावूक आहे. अनादी काळापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल रंगाचंच फूल दिलं जातं. त्यामुळे जर एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तर लाल रंगाचं फूल देऊन बेधडक तुमच्या मनातल्या भावना त्याला/ तिला सांगून मोकळं व्हा.
    • पिवळा गुलाब : व्हॅलेंटाइन डे फक्त प्रेम युगुलांसाठी असतो असं कोणी सांगितलं? आपण मित्र-मैत्रिणीदेखील हा दिवस साजरा करु शकतो. त्यामुळे मला तुझ्याशी मैत्री करायची आहे हा मेसेज पोहोचवण्यासाठी पिवळा गुलाब हा नक्कीच फायदेशीर ठरतो.
    • केशरी गुलाब : पिवळा, केशरी हे रंग धगधगत्या आगीशी जोडले जातात.
    • पांढरा गुलाब : पांढरा गुलाबही एका नव्या पर्वाची सुरूवात किंवा शेवटसुध्दा दर्शवतो. तेव्हा हा गुलाब देताना जरा जपून.
    • हिरवं गुलाब : खरं तर हे फूल पटकन कुठे मिळत नाही. परंतु, हे फूल निसर्गाची आठवण करुन देतो. त्यामुळे एक नव्या सुरूवातीशी, नव्या निर्मितीशी या रंगाचं नातं जोडलं जातं. कोणाच्या आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरूवात होत असेल तर तुम्ही तुमच्या सदिच्छा हिरवा गुलाब देत कळवू शकता.
    • जांभळा गुलाब : हिरव्या फूलाप्रमाणेच जांभळ्या रंगाचं गुलाबाचं फूलदेखील फार कमी वेळा पाहायला मिळतं. पण, हे फूल अत्यंत खास आहे. कारण, त्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहताच ‘मन मे लड्डू’ फुटावालं फिलिंग येतं किंवा व्हायोलिन्स वाजतात असं काही होतं ना त्यावेळी जास्त विचार करायचा नाही. थेट त्या व्यक्तीला जांभळ्या रंगाचं गुलाबाचं फूल देऊन टाकायचं. लव्ह अॅट फर्स्ट साईटचं प्रतीक म्हणजे जांभळ गुलाब.
    • काळा गुलाब : तुमची प्रिय व्यक्ती ब्लॅक मेटल रॉक म्युझिकची चाहती असेल आणि त्याचत्याच गोष्टींचा तिला तिटकारा असेल तरच हा गुलाब निवडा.
    • 1/12

Web Title: Valentines day special 2021 happy rose day importance and significance of rose colors ssj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.