• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. poco m3 sold over 1 lakh 50 thousand units during first sale on flipkart sas

स्वस्त स्मार्टफोनचा ‘जलवा’, पहिल्याच सेलमध्ये विकले 1.5 लाखांपेक्षा जास्त फोन; पुढचा सेल 16 फेब्रुवारीला

16 फेब्रुवारीला पुन्हा संधी …

Updated: September 9, 2021 00:35 IST
Follow Us
  • गेल्या आठवड्यातच लाँच झालेल्या पोकोच्या Poco M3 या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनला भारतीय ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. कारण ९ फेब्रुवारी रोजी या फोनसाठी पहिल्यांदाच फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्याच सेलमध्ये तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त Poco M3 फोनची विक्री झाली.
    1/10

    गेल्या आठवड्यातच लाँच झालेल्या पोकोच्या Poco M3 या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनला भारतीय ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. कारण ९ फेब्रुवारी रोजी या फोनसाठी पहिल्यांदाच फ्लॅश सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्याच सेलमध्ये तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त Poco M3 फोनची विक्री झाली.

  • 2/10

    कंपनीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे पहिल्याच सेलमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त Poco M3 फोनची विक्री झाल्याची माहिती दिली. यासोबतच 30 लाखांपेक्षा जास्त जणांनी फोनमध्ये स्वारस्य दाखवल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.

  • 3/10

    पहिल्या सेलमध्ये Poco M3 हा फोन खरेदी करु न शकलेल्यांसाठी १६ फेब्रुवारीला अजून एक संधी असेल, अशी माहितीही कंपनीकडून देण्यात आली. फ्लिपकार्टवर १६ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजेपासून फोनच्या दुसऱ्या सेलला सुरूवात होईल.

  • 4/10

    6जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6जीबी+128जीबी इंटरनल स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे.

  • 5/10

    पोको M3 फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :- या फोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले असून डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनही आहे. 6जीबी रॅम आणि 128जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आहे.

  • 6/10

    कॅमेरा :- फोटोग्राफीसाठी पोको M3 फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील 48 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसोबत एक 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आणि एक 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे.

  • 7/10

    सेल्फी कॅमेरा : याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेराही मिळेल.

  • 8/10

    बॅटरी :- 512जीबीपर्यंत माइक्रो एसडी कार्डचा सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये कंपनीने 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे.

  • 9/10

    कनेक्टिव्हिटी :- कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये IR ब्लास्टर, 4G VoLTE , वाय-फायशिवाय अन्य सर्व स्टँडर्ड पर्याय आहेत.

  • 10/10

    पोको M3 किंमत :- 6जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. तर, 6जीबी+128जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे.

Web Title: Poco m3 sold over 1 lakh 50 thousand units during first sale on flipkart sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.