• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. nissan magnite valentine offers get 100 percent cashback and variant upgrade also check magnite price and other specifications sas

Nissan ची धमाकेदार ऑफर, सर्वात स्वस्त SUV वर 100% कॅशबॅक; जाणून घ्या डिटेल्स

सर्वात स्वस्त SUV वर मिळतेय 100% कॅशबॅक…

Updated: September 9, 2021 00:35 IST
Follow Us
  • आघाडीची कार कंपनी Nissan India ने 2020 संपताना डिसेंबर महिन्यात आपली सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करुन ऑटो क्षेत्रात धमाका केला होता.
    1/15

    आघाडीची कार कंपनी Nissan India ने 2020 संपताना डिसेंबर महिन्यात आपली सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करुन ऑटो क्षेत्रात धमाका केला होता.

  • 2/15

    लाँचिंगनंतर काही दिवसांमध्येच या एसयूव्हीसाठी भारतीय ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

  • 3/15

    लाँच झाल्यानंतर अवघ्या पाच दिवसांमध्येच Nissan Magnite साठी 5,000 पेक्षा जास्त जणांनी बूकिंग केली होती. तर, महिन्याभरात बूकिंगचा आकडा 32 हजार 800 पेक्षा जास्त झाला.

  • 4/15

    त्यानंतर आता Nissan India ने आपल्या Magnite कस्टमर्ससाठी नवीन ऑफर आणली आहे. कंपनीने व्हॅलेंटाइन प्रोग्राम आणला आहे. याअंतर्गत मॅग्नाइट बूक करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीकडून लकी ड्रॉ काढला जाणार आहे.

  • 5/15

    ही ऑफर ३ महिन्यांपर्यंत सुरू राहणार असून यात कंपनी प्रत्येक ३० दिवसांनंतर लकी ड्रॉ काढणार आहे. दरमहिन्याला १०० ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळेल.

  • 6/15

    यातील १०० टक्के कॅशबॅक या धमाकेदार ऑफरचा लाभ एकाच ग्राहकाला मिळेल. तर, आठ ग्राहकांना अपडेटेड व्हेरिअंट, २५ ग्राहकांना एका वर्षाची एक्स्टेंडेड वॉरंटी आणि ६६ ग्राहकांना २ वर्षांची वॉरंटी मिळेल.

  • 7/15

    12 फेब्रुवारीपर्यंत मॅग्नाइट बूक केलेल्यांना आणि अद्याप डिलिव्हरी न मिळालेल्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळेल.

  • 8/15

    कंपनीने निसान एसयूव्हीसाठी इंजिनचे दोन पर्याय दिलेत. यात एक नॅचरली एस्पिरिटेड पेट्रोल इंजिन आणि एक टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा समावेश आहे.

  • 9/15

    यातील पहिलं B4D नॅचुरली एस्पिरेटेड 1.0 लिटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 72 hp पॉवर आणि 96 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या इंजिनद्वारे, 18.75 kpl इतका माइलेज मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

  • 10/15

    तर, दुसरं इंजिन 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 100 hp पॉवर जनरेट करतं. 5 स्पीड मॅन्युअल ट्रां​समिशनसह हे इंजिन 160 Nm टॉर्क आणि 20 kpl मायलेज देईल. तर, CVT गिअरबॉक्ससोबत 152 Nm टॉर्क आणि 17.7 kpl मायलेज मिळतो.

  • 11/15

    Nissan Magnite च्या केबिनच्या प्रीमियम फीचर्समध्ये Android Auto व Apple CarPlay ला सपोर्ट करणारी 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, सेगमेंट फर्स्ट 360 डिग्री अराउंड व्यू मॉनिटर, इन बिल्ट टायर प्रेशर मॉनिटर, 7 इंच टीएफटी इंस्टूमेंट क्लस्टर अशा फिचर्सचा समावेश आहे. याशिवाय व्हॉइस रिकग्निशन, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट हे फिचर्सही आहेत.

  • 12/15

    सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या एसयूव्हीमध्ये EBD सोबत ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, ड्युअल एअरबॅग्स, व्हेइकल डायनॅमिक्स कंट्रोल असे दर्जेदार फिचर्स आहेत.

  • 13/15

    या एसयूव्हीच्या निवडक व्हेरिअंटमध्ये कंपनी ‘टेक पॅक’ देखील देत आहे. यात वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग पॅड, एअर प्युरिफायर, जेबीएल स्पीकर्स, एंबियंट मूड लायटिंग फिचर्सचा समावेश आहे.

  • 14/15

    Nissan Magnite च्या पुढील बाजूला लार्ज सिंगल पीस ग्रिल, L शेपमध्ये LED DRLs, एलईडी लाइट गाइड, LED Bi-प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, LED फॉग लॅम्प्स आहे. याशिवाय faux स्किड प्लेट्स, स्प्लिट रॅपअराउंड LED टेल लॅम्प्स आणि ड्युअल टोन अॅलॉय व्हील्स आहे.

  • 15/15

    किंमत : डिसेंबर 2020 मध्ये लाँच केल्यानंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही भारतातील सर्वात स्वस्त एसयूव्ही होती. कारण 31 डिसेंबर 2020 पर्यंत बूक करणाऱ्यांसाठी कंपनीने या कारची एक्स-शोरुम किंमत 4.99 लाख रुपये ठेवली होती. त्यानंतर मॅग्नाइटच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आता 'निसान इंडिया'ने मॅग्नाइटच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 5.54 लाख रुपये (एक्स-शोरुम) ठेवली आहे. भारतात या एसयूव्हीची टक्कर ह्युंडाई व्हेन्यू, महिंद्रा XUV 300, फोर्ड इकोस्पोर्ट, टोयोटा अर्बन क्रुजर, होंडा WR-V, किया सोनेट आणि मारुती सुझुकी व्हिटारा ब्रेझा अशा लोकप्रिय गाड्यांसोबत असेल. ( सर्व फोटो : https://www.nissan.in/ )

Web Title: Nissan magnite valentine offers get 100 percent cashback and variant upgrade also check magnite price and other specifications sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.