• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy benefits of eating papaya fruit sdn

जाणून घ्या पपई खाण्याचे फायदे

Updated: September 9, 2021 00:33 IST
Follow Us
  • प्रत्येक सिझनमध्ये मिळणारी फळे ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. प्रत्येकाने दिवसातून एक तरी फळ खावे असे डायटीशियन सांगतात. मात्र मधुमेह, गर्भवती महिला किंवा इतर कोणतेही विकार असणाऱ्यांनी फळे खाताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. फळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसतात. पपई उष्ण असल्याने ती थंड वातावरणात खावी किंवा ती त्वचा नितळ होण्यासाठी चांगली असते अशा काही ढोबळ गोष्टी आपण ऐकत असतो. पण त्याचे काही फायदे जाणून घेतल्यास हे फळ खाणे का आवश्यक आहे हे समजणे सोपे होते. जवळपास सर्व सिझनमध्ये मिळणाऱ्या पपईचे आरोग्याला होणारे फायदे…
    1/10

    प्रत्येक सिझनमध्ये मिळणारी फळे ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. प्रत्येकाने दिवसातून एक तरी फळ खावे असे डायटीशियन सांगतात. मात्र मधुमेह, गर्भवती महिला किंवा इतर कोणतेही विकार असणाऱ्यांनी फळे खाताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. फळे आरोग्यासाठी चांगली असतातच पण या फळांचे आरोग्यासाठी असणारे विशिष्ट फायदे आपल्याला माहिती नसतात. पपई उष्ण असल्याने ती थंड वातावरणात खावी किंवा ती त्वचा नितळ होण्यासाठी चांगली असते अशा काही ढोबळ गोष्टी आपण ऐकत असतो. पण त्याचे काही फायदे जाणून घेतल्यास हे फळ खाणे का आवश्यक आहे हे समजणे सोपे होते. जवळपास सर्व सिझनमध्ये मिळणाऱ्या पपईचे आरोग्याला होणारे फायदे…

  • 2/10

    पपईमुळे व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार झाल्यावर त्यापासून लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते.

  • 3/10

    दिवसभराच्या धावपळीने आपल्याला बऱ्याचदा थकल्यासारखे जाणवते. अशावेळी वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास आलेला थकवा कमी होण्यास मदत होते.

  • 4/10

    वजन कमी करण्यास उपयुक्त. अनेकदा आपल्याला अवेळी भूक लागते मात्र पपईने या भुकेवर नियंत्रण मिळविणे शक्य होते.

  • 5/10

    घसा खवखवणे, सूज येणे यावर पपई गुणकारी आहे.

  • 6/10

    पपईमध्ये जीवनसत्त्व ‘अ’चे प्रमाण मुबलक असते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ‘अ’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. वयानुसार दृष्टी कमी होण्याची समस्या उद्भवू नये यासाठी पपई खाणे फायदेशीर ठरते.

  • 7/10

    जेवणाच्या वेळा बदलणे, काही कारणांनी बाहेरचे खावे लागणे, वातावरणातील बदल यांचा शरीरावर परिणाम होत असतो. यामध्ये पचनशक्तीवर परिणाम होतो. मात्र पपई खाल्ल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

  • 8/10

    पपईचे काप खाल्ल्यास त्वचेसंबंधीत तक्रारी दूर होतात.

  • 9/10

    तोंडाचा अल्सर झाल्यास फायदेशीर.

  • 10/10

    ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

Web Title: Healthy benefits of eating papaya fruit sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.