-
पूर्वी पदार्थांची गोडी वाढवण्यासाठी साखरेपेक्षा अधिक वापर गुळाचा केला जायचा. गुळही साखरेसारखा ऊसापासूनच तयार केला जातो, पण तरीही गूळ मात्र साखरेपेक्षा आरोग्यास जास्त फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊयात गूळ खाण्याचे फायदे.
-
गूळ-शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन लवकर वाढते.
-
घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.
-
जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते.
-
शारीरिक अशक्तपणा आल्यानंतर गूळ खाल्ल्यास जास्त फायदा होतो.
-
थंडीत गूळ खाणं जास्त फायदेशीर असते, पण तो अतिप्रमाणात मात्र खाऊ नये कारण गूळ उष्ण असतो.
-
मासिक पाळीच्यावेळी तीळ-गूळ खाल्ल्याने पोट दुखणे कमी होते. पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं.
-
शरीरातील धातुंची झीज भरून काढण्याचे महत्त्वाचे कार्य गूळ करतो.
-
रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.
-
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
जाणून घ्या गूळ खाण्याचे गुणकारी फायदे…
Web Title: Healthy benefits of eating jaggery daily sdn