-
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरु काढण्यासाठी किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी ताक हा सर्वोत्तम पर्याय आहे. कोल्डड्रिंक किंवा अन्य शीतपेय पिण्यापेक्षा ताक, पन्ह, उसाचा रस हे अत्यंत सुंदर पर्याय आहेत. त्यामुळे ताक पिण्याचे शरीरासाठी कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.
-
दुग्धजन्य पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे ताक. शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि अनेक गुणधर्म ताकात आहेत. दह्यामध्ये पाणी मिक्स करुन ते घुसळलं की ताक तयार होतं. ताक प्यायल्यामुळे सतत लागणारी तहान शमते.
-
ताकामुळे वजन नियंत्रणात राहतं.
-
ताक प्यायल्यामुळे पोट पटकन भरतं.
-
ताकामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जुन ताक प्यावं.
-
ताकामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.
-
पचनक्रिया सुरळीत राहते.
-
अपचन, पित्ताचा त्रास, गॅसेस यांचा त्रास कमी होतो.
-
अन्नपचन नीट होतं.
-
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
‘हे’ आहेत उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे
Web Title: Healthy benefits of drinking butter milk daily in summer sdn