Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. strom r3 pre bookings open for two seater electric car with 200 km range indias most affordable electric car sas

झकास! भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, १० हजारांत बुकिंगला झाली सुरूवात; किंमत फक्त…

आली भारतातील सर्वात स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक कार…

Updated: September 9, 2021 00:32 IST
Follow Us
  • भारताच्या ऑटो सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड सतत वाढतेय. पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमती हे त्यामागील एक कारण आहे. त्यामुळे बहुतांश मोठ्या कार कंपन्यांनी सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रीत केलंय. सतत नवनवीन इलेक्ट्रिक कार देशाच्या ऑटो मार्केटमध्ये येत आहेत. अशातच आता मुंबईच्या एका स्टार्टअप कंपनीने आपली स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली आहे. ही कार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा दावाही कंपनीने केलाय.
    1/10

    भारताच्या ऑटो सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड सतत वाढतेय. पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमती हे त्यामागील एक कारण आहे. त्यामुळे बहुतांश मोठ्या कार कंपन्यांनी सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रीत केलंय. सतत नवनवीन इलेक्ट्रिक कार देशाच्या ऑटो मार्केटमध्ये येत आहेत. अशातच आता मुंबईच्या एका स्टार्टअप कंपनीने आपली स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवली आहे. ही कार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा दावाही कंपनीने केलाय.

  • 2/10

    ही नवीन इलेक्ट्रिक कार Strom Motors ने लाँच केली असून Strom R3 असं या कारचं नाव आहे. कंपनीने भारतात या कारसाठी बुकिंगलाही सुरूवात केली आहे. या कारसाठी बूकिंग पुढील काही आठवडे सुरू असणार आहे. सुरूवातीला ग्राहकांना 50,000 रुपयांच्या अपग्रेड्सचा फायदा मिळेल. यात कस्टमाइज्ड कलर ऑप्शन, प्रीमियम ऑडिओ सिस्टिम आणि तीन वर्षांपर्यंत फ्री मेन्टेनन्सचा समावेश आहे.

  • 3/10

    १० हजार रुपयांमध्ये या कारसाठी प्री-बुकिंगला सुरूवात झाली आहे. सध्या कंपनीने केवळ मुंबई आणि एनसीआरमध्ये प्री-बुकिंग घेण्यास सुरूवात केली आहे, पण लवकरच अन्य शहरांमध्येही सुरूवात होईल.

  • 4/10

    Strom R3 कारच्या लूकबाबत बोलायचं झाल्यास या इलेक्ट्रिक कारमध्ये तीन व्हील्स आहेत, पण दिसायला थ्री-व्हीलर किंवा रिक्षाप्रमाणे ही कार दिसत नाही. या कारचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही कार थ्री व्हीलर आहे पण रिक्षाप्रमाणे पुढे एक चाक आणि मागे दोन चाक अशी या कारची रचना नाहीये, तर याच्या अगदी उलट म्हणजे मागे फक्त एक चाक आणि पुढे दोन चाक अशी या कारची रचना आहे.

  • 5/10

    इलेक्ट्रिक कार Strom R3 ला बघून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल, कारण दोन चाकं पुढे आणि फक्त एक चाक मागे आहे. तीन चाकांची ही जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

  • 6/10

    एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर Strom R3 जवळपास 200 किमीचा प्रवास करु शकते असा कंपनीचा दावा आहे. यात 4G कनेक्टेड डायग्नोस्टिक इंजिन आहे, त्याद्वारे चालकाला ट्रॅक लोकेशन आणि चार्जिंग स्टेटसची माहिती मिळते. Strom आर 3 एक लिथियम-आयन बॅटरी पॅक आणि एका इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालते. जी 20hp / 90Nm पॉवर आणि टॉर्क देते. कंपनीने या कारच्या बॅटरीवर 1 लाख किलोमीटर प्रवास किंवा 3 वर्षांपर्यंतची वॉरंटी दिली आहे. तीन तासांत या कारची बॅटरी 100 टक्के चार्ज होते, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

  • 7/10

    Strom R3 कारच्या साईडला ब्लॅक्ड आऊट बी पीलर्स, ORVMs, अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कारच्या मागच्या बाजूला टेललाईट्स आहेत. ही इलेक्ट्रिक कार 2,907 mm लांब, 185 mm रुंद आणि 550 किलो वजनाची आहे. Strom R3 मध्ये एक सनरूफ, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पॉवर विंडो, रिमोट कीलेस एंट्री, 12 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि 3-स्पोक स्टीयरिंग व्हीलसह 2-सीटर केबिन आहे.

  • 8/10

    Strom R3 कारमध्ये 4.3 इंचांचं टचस्क्रीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, आयओटी-सक्षम कंटिन्यूअस मॉनिटरिंग सिस्टिमसह 7.0 इंचांचं वर्टिकल-पोस्ट टचस्क्रीन कन्सोल आणि सहायक 2.4 इंच टचस्क्रीन युनिट देण्यात आलं आहे.

  • 9/10

    ही कार ब्रेकिंग आणि तीन ड्रायव्हिंग मोड्ससह येते. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स असे मोड्स यात देण्यात आले आहेत. अवघ्या तीन तासात या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होऊ शकते. यंदा बुकिंग केल्यानंतर २०२२ पासून या टू-सीटर इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी सुरू होईल. कंपनीला अवघ्या चार दिवसांमध्येच या कारसाठी जवळपास 705 कोटी रुपयांच्या बुकिंग्स(165 युनिटसाठी) मिळाल्या आहेत.

  • 10/10

    सध्या कंपनीने केवळ दिल्ली आणि मुंबईतच Strom R3 साठी बुकिंग घेण्यास सुरूवात केली आहे. पण लवकरच अन्य शहरांमध्येही बूकिंगला सुरूवात होईल. कंपनीने 4.5 लाख रुपये इतकी Strom R3 ची किंमत ठेवली आहे. (सर्व फोटो सौजन्य – strommotors.com)

Web Title: Strom r3 pre bookings open for two seater electric car with 200 km range indias most affordable electric car sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.