-
जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर ‘पोको’ कंपनीचा Poco X3 हा स्मार्टफोन उत्तम पर्याय ठरु शकतो. कारण, एक दिवसापूर्वीच पोको कंपनीने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Poco X3 Pro लाँच केलाय. त्यामुळे कंपनीने Poco X3 च्या किंमतीत घसघशीत कपात केली आहे. जाणून घेऊया Poco X3 चे फिचर्स आणि नवीन किंमत :-
-
Poco X3 मध्ये तब्बल 6,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली असून फास्ट चार्जिंगचा सपोर्टही आहे.
-
यासोबतच फोनमध्ये एकूण पाच कॅमेऱ्यांचा सपोर्ट देण्यात आला आहे. 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी, 64MP चा मुख्य कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 732जी ऑक्टा-कोर प्रोसेसर, असे शानदार फीचर्स या फोनमध्ये आहेत.
-
कोबाल्ट ब्लू आणि शॅडो ग्रे अशा दोन रंगाच्या पर्यायात हा फोन उपलब्ध आहे.
-
Poco X3 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे.
-
8जीबीपर्यंत रॅमची क्षमता असलेल्या या फोनमध्ये प्रोसेसरसाठी स्नॅपड्रॅगन 732G SoC चिपसेट आहे.
-
फोटॉग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो शूटर असा सेटअप आहे.
-
याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
-
तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी फोनमध्ये असून 128जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मेमरी आहे. आवश्यकता असल्यास मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.
-
नवीन किंमत : Poco X3 लाँच करतेवेळी याच्या 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये होती. पण आता Poco X3 Pro लाँच होताच कंपनीने Poco X3 च्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे Poco X3 च्या बेसिक व्हेरिअंटसाठी आता तुम्हाला 15 हजारांपेक्षा कमी म्हणजे 14 हजार 999 रुपये मोजावे लागतील. याशिवाय हा फोन 8जीबी रॅम+128जीबी स्टोरेजमध्येही उपलब्ध आहे. लाँचिंगवेळी टॉप व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये होती. सध्या कंपनीकडून केवळ बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात झाली आहे. पण १ एप्रिलनंतर टॉप व्हेरिअंटमध्येही दोन हजार रुपयांची कपात होण्याची दाट शक्यता आहे.
2000 रुपयांनी स्वस्त झाला दमदार Poco X3, लेटेस्ट स्मार्टफोन लाँच करताच कंपनीने केली किंमतीत कपात
१५ हजारांपेक्षा कमी झाली किंमत, मिळेल तब्बल 6000mAh क्षमतेच्या बॅटरीसह अनेक शानदार फिचर्स
Web Title: Poco x3 gets permanent price cut after poco x3 pro india launch check new latest price sas