• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. kia ev 6 price specifications and features scsg

एका चार्जिंगमध्ये ५०० किमी प्रवास… कियाने लॉन्च केली दमदार SUV; जाणून घ्या फिचर्स, किंमत

इलेक्ट्रीक व्हेइकल असणारी ही गाडी साडेतीन सेकंदांमध्ये १०० किमी प्रती तास वेग घेऊ शकते

Updated: September 9, 2021 00:29 IST
Follow Us
  • इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला इलेक्ट्रीक व्हेइकल म्हणजेच विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या क्षेत्रात थेट टक्कर देणारी कंपनी म्हणजे दक्षिण कोरियाच्या किया मोटर्स. किया मोटर्स याच स्पर्धेमध्ये एक पाऊल पुढे टाकत मंगळवारी आपल्या ईव्ही सिक्स (EV 6) ही गाडी बाजारात लॉन्च केलीय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
    1/15

    इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला इलेक्ट्रीक व्हेइकल म्हणजेच विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या क्षेत्रात थेट टक्कर देणारी कंपनी म्हणजे दक्षिण कोरियाच्या किया मोटर्स. किया मोटर्स याच स्पर्धेमध्ये एक पाऊल पुढे टाकत मंगळवारी आपल्या ईव्ही सिक्स (EV 6) ही गाडी बाजारात लॉन्च केलीय. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

  • 2/15

    EV 6 ही कियाची पहिलीच डेडिकेटेड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली एसयूव्ही प्रकारातील इलेक्ट्रीक कार आहे. म्हणजेच या कारसाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान कंपनीने स्वत: विकसित केलं आहे.

  • 3/15

    कंपनीने स्वत: विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळेच एका चार्जिंगमध्ये EV 6 ही गाडी तब्बल ५०० किलोमीटरचं अंतर कापू शकते असा दावा कंपनीने केलाय.

  • 4/15

    किया मोटर्सने पुढील ९ महिन्यांमध्ये ३० हजार EV 6 जगभरामध्ये विकण्याचं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे.

  • 5/15

    पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये जगभरात एक लाख EV 6 गाड्या विकण्याचा कंपनीचा मानस आहे.

  • 6/15

    किया मोटर्सने इलेक्ट्रीक व्हेइकलच्या बाजारपेठेमध्ये टप्प्याटप्प्यात उतरण्यासंदर्भात २०२६ पर्यंतचा दिर्घकालीन प्लॅन तयार केला आहे. या कालावधीमध्ये कंपनी ११ इलेक्ट्रीक गाड्या बाजारात आणणार असून EV 6 त्यापैकीच पहिली कार आहे.

  • 7/15

    एका ऑनलाइन वर्ल्ड प्रीमियम इव्हेंटमध्ये किया कंपनीने आपली मुख्य सहकारी कंपनी असणाऱ्या होंडाई मोटर ग्रुपच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलरच्या प्लॅटफॉर्मवरुन EV 6 लॉन्च केली. याच प्लॅटफॉर्मवरुन होंडाईने इयोनीक फाइव्ह ही गाडी मागील महिन्यात लॉन्च केली होती.

  • 8/15

    किया मोटर्सचे अध्यक्ष साँग हो-सुंग यांनी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये "EV 6 ही आमची पहिली गाडी आहे ज्या माध्यमातून आम्ही एक गाड्या तयार करणारी कंपनी म्हणून नवीन दृष्टीकोनातून पुढील प्रवास करणार असल्याची घोषणा आहोत," असं सांगितलं.

  • 9/15

    २०३० पर्यंत कंपनीने आपल्या एकूण गाड्यांपैकी ४० टक्के गाड्या या पार्यावरणला हानी न पोहचवणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित असाव्यात असं धोरण निश्चित केलं आहे. याच धोरणाच्या दिशेने कंपनीने EV 6 च्या माध्यमातून पहिलं पाऊल टाकलं आहे.

  • 10/15

    गाडीचे फिचर्स काय? > किया EV 6 बॅटरी पॅकच्या दोन पर्यायांसहीत उपलब्ध आहे. एक स्टॅण्डर्ड ज्यामध्ये ५८ किलोव्हॅट प्रती तास (kWh) बॉटरी पॅक आणि दुसरं ७७.४ किलोव्हॅट प्रती तास (kWh) असे पर्याय उपलब्ध असतील.

  • 11/15

    ८०० व्होल्ट सिस्टीम असणारी लांब पल्ल्याच्या प्रवासाठी वापरण्याजोगी EV 6 एकदा चार्ज केल्यावर ५१० किमीपेक्षा अधिक अंतर जाऊ शकते.

  • 12/15

    हुंडाईने मागील महिन्यात लॉन्च केलेल्या इयोनीक फाइव्ह एकदा चार्ज केल्यावर ४३० किमीपर्यंत जाते. EV 6 ही तिच्यापेक्षा अधिक शक्तीशाली कार असल्याचे दिसत आहे.

  • 13/15

    १८ मिनिटांमध्ये EV 6 ची ८० टक्क्यांहून अधिक बॅटरी चार्ज करता येते.

  • 14/15

    EV 6 अवघ्या साडेतीन सेकंदामध्ये १०० किमी प्रती तास इतका वेग घेऊ शकते. EV 6 मध्ये इतर इलेक्ट्रीक गाड्यांपेक्षा अधिक जास्त जागा आणि अधिक सुंदर डिझाइन देण्याचा प्रयत्न कियाने केला आहे.

  • 15/15

    कियाने दिलेल्या माहितीनुसार EV 6 ची किंमत भारतीय चलनामध्ये जवळजवळ ३० लाख ते ३६ लाखांच्या दरम्यान असू शकते.

Web Title: Kia ev 6 price specifications and features scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.