• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. world bicycle day 2021 health benefits of regular cycling fitness exercise weight loss information sdn

World Bicycle Day : वजन कमी करण्यासोबतच सायकलिंगचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?

June 3, 2021 12:40 IST
Follow Us
  • World Bicycle Day 2021
    1/10

    योग आणि इतर व्यायाम प्रकरांप्रमाणेच सायकलिंग करणं हे देखील आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. सायकलिंगमुळे तुम्ही फिटनेस तर नक्कीच मिळवू शकता मात्र त्याचसोबत तरुण दिसण्यासाठी सायकलिंगची मदत होऊ शकते.

  • 2/10

    सायकलिंगमुळे फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी मदत होते. एवढच नाही तर निरोगी हृदयासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे.

  • 3/10

    व्यायाम म्हणून काही तास सायकलिंग केल्यास रक्त पेशी आणि त्वतेमध्ये ऑक्सीजनचं पुरेसं प्रमाण उपलब्ध होतं. जेणे करून त्वचा निरोगी आणि तजेलदार राहते. त्यामुळे तरुण दिसण्यासाठी सायकलिंगचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

  • 4/10

    सायकलिंगमुळे शरीरातील रोगप्रतिकारक पेशी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे आजारी होण्याची शक्यता कमी होते.

  • 5/10

    सायकलिंग करणाऱ्यांच्या मेंदूच्या पेशी अधिक सक्रिय असल्याचं आभ्यास समोर आलंय. तसचं नविन पेशी तयार होण्यास मदत होते. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

  • 6/10

    जर तुम्ही दिवसा योग्य वेळ सायकलिंग केली तर तुम्हाला रात्री चांगली झोप लागू शकते. सकाळच्या वेळी सायकलिंग करताना जरी थकवा आला तरी नंतर संपूर्ण दिवस चांगली एनर्जी राहते आणि झोपही चांगली लागते.

  • 7/10

    सायकलिंगमुळे शरीराचे अनेक स्नायू मजबूत होतात. शिवाय शरीरात रक्ताभिसरण चांगलं होतं. यामुळे लैगिंक क्षमता वाढण्यास मदत होते.

  • 8/10

    नियमित सायकलिंग केल्याने हृदयाचं कार्य सुरळीत राहतं.

  • 9/10

    सायकलिंग सारख्या व्यायामामुळे शरीरातील कॅलरीज आणि फॅटस् कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

  • 10/10

    आठवड्यातून काही तास नियमित व्यायम करण्याचे असे अनेक फायदे आहेत. यासाठी सकाळच्या वेळी सायकल चालवणं अधिक उत्तम ठरू शकतं.

Web Title: World bicycle day 2021 health benefits of regular cycling fitness exercise weight loss information sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.