-
झुरळ म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. घरातील अस्वच्छ ठिकाणी बऱ्याच वेळा झुरळांचा वावर असतो. पण या नावडत्या कीटकांना घरातून हद्दपार कसे करावयाचे? असा प्रश्न सर्वांना पडतोच.
-
त्यांना मारण्यासाठी चपलेपासून अत्यंत महागड्या कीटकनाशकांपर्यंतचे उपाय योजले जातात. काहीजणं घरातील झुरळ घालवण्यासाठी पेस्टकंट्रोलही करता. पण या झुरळांपासून सुटका करायची असेल तर हे घरगुती उपाय नक्कीच करुन पाहा.
-
घरात झुरळ फिरत असलेल्या ठिकाणी कडूलिंबाच्या पानांचे तेल किंवा पावडर टाकावी. कडूलिंबाच्या पानांमध्ये असलेल्या उग्र दर्पामुळे झुरळ लवकर मरतात. जर झुरळांपासून सुटका हवी असेल तर हे उपाय एकदा नक्की करुन पाहा.
-
-
तमालपत्राचा वास काहीसा उग्र असतो. त्यामुळे घरातील ज्या भागामध्ये झुरळांचा वावर जास्त आहे. त्या ठिकाणच्या कोपऱ्यांमध्ये तमालपत्रांची पानं चुरगळून ठेवावीत. ती हवेने उडू नयेत म्हणून एका पातळ कपड्यामध्येही तुम्ही बांधून ठेवू शकता.
-
बोरिक पावडर आणि साखर समप्रमाणात घेऊन हे मिश्रण एकत्र करुन घरातील कोपऱ्यांमध्ये ठेवावी. खासकरुन ज्या ठिकाणी अंधार आणि ओलावा आहे अशा जागेवर ही पावडर टाकावी.
-
चवीला तीक्ष्ण आणि तसाच वास असलेली लवंग जशी आजारपणात गुणकारी ठरते तशीच ती झुरळांना पळवून लावण्यासाठीही मदत करते. त्यामुळे झुरळ ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी लवंग ठेवावीत.
झुरळांपासून सुटका हवी? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा
जाणून घ्या घरगुती उपाय..
Web Title: Home remedy for getting rid of cockroaches avb