Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health tips conman vegetable can cause surprising side effects including carrot beetroot and cabbage kpw

रोजच्या आहारातील ‘या’ भाज्यांचे दुष्परिणाम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

बऱ्याच चांगल्या पदार्थांचं अति सेवनही आरोग्यास हानीकारक ठरू शकतं.

June 10, 2021 18:11 IST
Follow Us
  • vegetable-side-effects
    1/6

    आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट असणाऱ्या अनेक भाज्यांपैकी काही भाज्या अशा आहेत की ज्याचं अति सेवन केल्यास आरोग्यास फायदा होण्याएवजी त्याचे आरोग्यावर काही दुष्परिणाम होवू शकतात. त्यामुळे या भाज्यांचं सेवन करताय तर नक्की काळजी घ्या.

  • 2/6

    हेल्दी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या भाज्या खाण्यावर भर देत असतात. अनेक जण आहारात गाजर खाण पसंत करतात. गारजामध्ये अनेक पोषक तत्व आहेत. मात्र गाजर खात असताना ते योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे. जास्त प्रमाणात गाजर खाल्ल्यास त्वतेचा रंग बदलू शकतो. त्वचा पिवळसर रंगाची होवू शकते. अति प्रमाणात गाजराचं सेवन केल्यास शरीरात बीटा कॅरेटीनचं प्रमाण वाढतं. बीटा कॅरेटीनचं प्रमाण जास्त झाल्यास ते रक्तात न जाता त्वेचेमध्ये साठू लागतं आणि त्वचा पिवळी पडते. खास करून हात, पाय आणि तळव्यांवर त्वचेचा बदललेला रंग अधिक दिसून येतो.

  • 3/6

    अनेक जण बर्‍याचदा सॅलडमध्ये ब्रोकोली आणि कोबी खातात. परंतु मात्र जास्त प्रमाणात कोबी आणि ब्रोकोली कच्चे खाल्ल्याने तुमच्या पोटात गॅस होवू शकतो. तसचं अपचन होण्याची शक्यता वाढते. यासोबतच अनेक जण कच्चा फुलकोबी खाणं पसंत करतात. खरं तर या भाज्यामध्ये असलेली एका विशिष्ट प्रकारची सारख भाजी शिववल्याशिवाय विरघळत नाही. या भाज्यांमधील जीवनसत्वांचा पुरेपुर फायद्या करून घ्यायचा असेल तर या भाज्या शिजवून खाणं गरजेचं आहे.

  • 4/6

    वांग खाल्ल्याने तुम्हाला पोटाच्या समस्या उद्घवू शकतात. कच्च किंवा अर्धवट शिजलेलं वांग खाल्यास उलट्या होणे, चक्कर येणे किंवा पोटदुखी होऊ शकते. वांग्यात आढळणाऱ्या सोलानाइनमुळे मज्जातंतू आणि लैगिंक आरोग्यासंबधीत समस्या निर्माण होवू शकतात. त्यामुळे वाग्याचं पूर्णपणे शिजवूनच कायम सेवन करावं

  • 5/6

    मशरुम हा ड जीवनसत्वाचा मोठा स्त्रोत मानला जातो. विविध प्रकारे मशरुमचं सेवन केलं जातं. मशरुमची भाजी, पाव़डर, सप्लिमेन्टस् तसचं कच्च्या स्वरुपात मशरुमचं सेवन केलं जातं. वेगवेगळ्या स्वरुपात केलं जाणारं मशरुमचं सेवन आरोग्यास हितकारक असतं तसचं मशरुमचा बर्‍याच आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून उपयोग केला जात आहे. असं असलं तरी मशरुमचं अति प्रमाणात सेवन केल्यास प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. मशरुमच्या अति सेवनाने मळमळ, पोटदुखी आणि उलट्या होवू शकतात.

  • 6/6

    शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी बीट अत्यंत फायदेशीर आहे. अनेक जण सॅलड्स आणि सँडविचमध्ये बीटचं सेवन करतात तर अनेक जण बीटचा ज्यूस पीणं पसंत करतात. बऱ्याच चांगल्या पदार्थांचं अति सेवन आरोग्यास हानीकारक ठरू शकतं. त्याचप्रमाणे बीटमध्ये ऑक्सलेट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे बीटाच्या अति सेवनाने किडनी स्टोन होण्याची शक्यता वाढते. तसचं यामुळे शरीरात कॅल्शियम शोषण्यास देखील अडथळा निर्माण होवू शकतो. त्यामुळे कोणत्याही पदार्थांचं सेवन करताना ते प्रमाणात करणं गरजेचं आहे. (all file photo)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Health tips conman vegetable can cause surprising side effects including carrot beetroot and cabbage kpw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.