-
पावसाळा सुरु झाला की ताप, सर्दी, डोकेदुखी, खोकला असे आजार डोकं वर काढू लागतात. त्यामुळे बऱ्याच वेळा गृहिणी गवती चहा करतात. विशेष म्हणजे चहाची चव वाढविणाऱ्या या गवती चहाचे अनेक विविध फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊयात गवती चहाचे
-
सर्दी, पडसं किंवा ताप आल्यास गवती चहा प्यावा तसंच या त्याच्या काढ्याने वाफारा घ्यावा.
-
पोट दुखत असल्याच किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा.
-
डोकं दुखत असल्यास साध्या चहाच्या पाण्यात चार पानं गवती चहाची घालावीत.
-
थंडी-ताप किंवा आकडी येत असल्यासही गवती चहा उकळून प्यायल्यास आराम मिळतो.
-
जर पोट फुगत असेल तर गवती चहाचा काढा घ्यावा.
-
शरीराचा कुठलाही अवयव दुखत असल्यास गवती चहाच्या तेलाने त्या भागावर मालिश करावी.
-
गवती चहा उष्ण, स्वेदजनन, मूत्रजनन, ज्वरघ्न, वायुनाशी, उत्तेजक, चेतनाकारक, संकोचविकासप्रतिबंधक आहे.
-
गवती चहाला सुगंध भूतृण (संस्कृत), अग्याघास, गंधबेना (हिंदी), हरिचांय (सिंधी), गंधतृण (बंगाली), लेमनग्रास (इंग्रजी) अशा विविध नावाने संबोधलं जातं. तर त्याच्या अर्कास‘ऑइल ऑफ व्हर्बेना’ किंवा ‘इंडियन मेलिसा ऑइल’ असेही म्हणतात.
-
ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात गवती चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे
Web Title: Monsoon tips healthy benefits of drinking lemongrass tea during rainy season stay fit and healthy sdn