-
काळे ओठ किंवा ड्राय ओठ अनेकांसाठी चिंतेचा विषय असतो. प्रत्येक तरूणीला गुलाबी व मुलायम ओठ हवे असतात. पण हवे तसे ओठ मिळविण्यासाठी नेमके कोणते उपाय करायचे याबाबत बऱ्याचदा माहिती नसते. बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या सौदर्य प्रसाधनांचा देखील काही तासच ओठांवर परिणाम दिसतो. त्यानंतर 'जैसे थे' अशीच परस्थिती असते. घरगुती उपाय करून ओठांची काळजी घेतल्यास तुलनेने लवकर आणि अधिक प्रभावी परिणाम दिसून येतात. या गॅलरीमधून आपण घरगुती वापरातील वस्तूंचा वापर करुन ओठांची निगा कशी राखता येईल आणि ते गुलाबी कसे ठेवता येतील यासंदर्भात जाणून घेणार आहोत. या टीप्स तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील याची खात्री आहे.
-
मध व साखरेचा स्क्रब – मध व साखर एकत्र मिक्स करून ओठांवर लावल्यास ओठांवरील सर्व मृत पेशी (डेड सेल्स ) निघून जातात आणि त्वचा मऊ व पूर्ववत होते. मध तुमच्या ओठांना ओलावा पुरवते. तसेच, ओठांवर आलेली काळसर छटा ही मधामुळे कमी होते. हा उपाय करण्यासाठी वाटित एक चमचा साखर घ्यावी. त्यात एक चमचा मध घ्यावे. हे मिश्रण १० मिनिटे ओठांवर घासावे आणि मग स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे.
-
हळद – हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे ओठांचा काळसरपणा कमी होण्यास मदत होते. एक चमचा दूध व अर्धा चमचा हळद घेऊन त्याचे मिश्रण ५ ते १० मिनिटे ओठांवर लावावे. त्यानंतर हायट्रेटिंग बाम ओठांवर लावावा.
-
पुदिना आणि लिंबू – लिंबात सायट्रिक अॅसिड आणि क जीवनसत्त्व म्हणजे व्हिटॅमिन सी असतं. यामुळे त्वचेच्या संबंधित समस्येवर लिंबू गुणकारी ठरतो. पुदिन्याची चार-पाच पाने वाटून त्यात एक चमचा मध व अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करावा. मग हे पॅक ओठांवर लावावे. या पॅकमुळे त्वचा ओली, मऊ व तजेलदार होते
-
डाळिंब आणि दूध – दुधामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. तर डाळिंबात पुनिक्यालगिन नावाचा घटक असतो. जो त्वचेचा काळेपणा कमी करतो. गुलाबी ओठ मिळविण्यासाठी डाळिंब व दुधाचे मिश्रण पंधरा मिनिटे ओठांवर लावून ठेवावे आणि मग धुऊन घ्यावे. दर दिवशी यापैकी कोणतेही उपाय केल्यास तुम्हाला ओठांचा रंग गुलाबी झाल्याचे नक्कीच जाणवेल.
काळे ओठ गुलाबी करण्यासाठी वाचा या टिप्स
Web Title: Beauty tips for pinker and dray lips mrs