-
ऋषिकेश – उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश हे महिलांच्या सोलो ट्रीपसाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव एक पवित्र तीर्थक्षेत्र असून ऋषिकेशला निसर्गाचा वारसा लाभला आहे. येथे मोठमोठ्या पर्वतरांगा, खळखळत वाहणारी गंगा नदी येथील आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. तसंच लक्ष्मण झुला,त्रिवेणी घाट, स्वर्ग आश्रम, रामझूला, परमार्थ निकेतन घाट, नीलकंठ महादेव मंदिर, भरत मंदिर, कैलाश निकेतन मंदिर, वशिष्ठ गुफा, गीता भवन, मोहनचट्टी ही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. ऋषिकेशला रेल्वेमार्ग, हवाईमार्ग आणि रस्तेमार्गाने जाता येऊ शकतं.
-
जयपूर – पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेलं जयपूर पर्यटनाच्या दृष्टीने फार सुंदर ठिकाण आहे. येथे हवा महल, जल महल, नाहरगढचा किल्ला, आमेरचा किल्ला, जंतर-मंतर, सिटी पॅलेस, गल्ताजी, बिरला मंदिर, गढ गणेश मंदिर, जयगढचा किल्ला, या ठिकाणांना पर्यटनासाठी पहिली पसंती दिली जाते.
-
झिरो व्हॅली – अरुणाचल प्रदेश म्हटलं की डोळ्यासमोर झिरो व्हॅली येते. अनेक जण या व्हॅलीला स्वर्गदेखील म्हणतात. महिलांसाठी सोलो ट्रीप करण्यसाठी ही अत्यंत सुंदर जागा आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक हवा असेल तर येथे नक्कीच भेट द्यायला हवी.
-
हम्पी – हम्पी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. हम्पी येथील श्री विरुपाक्ष मंदिर हे प्रसिद्ध आहे. युनेस्कोद्वारे हम्पी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी महिला सोलो ट्रीप करु शकतात.
-
पदुच्चेरी – येथे सोलो ट्रीपसाठी आलेल्या महिला अॅडव्हेंचर स्पोर्टसचा आनंद घेऊ शकतात. येथे फिरण्यासाठी सुंदर ठिकाणं आणि खाण्याचे एकाहून एक सरस पदार्थ मिळतात. त्यामुळे ज्या महिला खवैय्या आहेत आणि ज्यांना अॅडव्हेंचर अनुभव घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी नक्कीच भेट द्या.
महिलांनो, सोलो ट्रिपसाठी ही शहरं आहेत सेफ; भारतातील या शहरांमध्ये बिनधास्त फिरा
Web Title: Best indian destinations safe enough for solo women travellers trip good vacation adventurous sdn