-
आपण अनेकदा बाहेर फिरायला गेल्यानंतर राहण्यासाठी एखाद्या हॉटेलची निवड करतो. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्काम केला असेल. या हॉटेलच्या रुममधील बेडवर नेहमी पांढऱ्या रंगाची चादर अंथरलेली असते.
-
पांढऱ्या रंगाच्या चादरवर पटकन डाग लागतात. पण तरीही बेडवर पांढऱ्या रंगाची चादरच का वापरली जाते, इतर दुसऱ्या रंगाची चादर का वापरत नसता? याचा तुम्ही विचार केलाय का? चला तर जाणून घेऊया, यामागे नेमकी काय महत्त्वाची कारणे आहेत.
-
एखादा ग्राहक जेव्हा हॉटेलमध्ये जातो, तेव्हा त्यांना सर्व गोष्टी या अधिक स्वच्छ हव्या असतात. त्यामुळे हॉटेलमधील प्रत्येक रुममधील बेडवर पांढरी चादर अंथरलेली असते.
-
पांढरा रंग हा स्वच्छतेचे आणि शांततेचे प्रतीक आहे. त्यामुळे त्या रुममधील सर्व गोष्टी स्वच्छ दिसतात.
-
तसेच जेव्हा बेडवर पांढरी चादर घातली जाते, तेव्हा ती खोली अतिशय स्वच्छ आणि नीटनेटकी दिसते. फक्त हॉटेलमध्येच नाही तर हॉस्पिटलमधील बेडवर पांढरी चादरच वापरली जाते.
-
मात्र ही पांढरी चादर तुम्हाला स्वच्छ वाटत असली, तरी त्यावर पटकन डाग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहक सहसा खाताना किंवा पिताना डाग पडू नये याची विशेष काळजी घेतो.
-
हॉटेलची खोली आणि बेड हे जेवढे स्वच्छ आणि आरामदायक असतील, तेवढंच ग्राहकांना तिथे चांगले वाटते. त्यांचे मन प्रसन्न होते.
-
पांढऱ्या चादरी साफ करणे फार सोपे आहे. हॉटेलमधील पांढऱ्या चादरींना ब्लिच केले जाते. ज्यामुळे चादरीवर पडलेला डाग सहज निघून जातो. तसेच चादरीचा रंगही टिकून राहतो आणि त्यावर वेगळी चमक येते.
-
पांढऱ्या चादरीमध्ये ब्लीचचा वापरही कमी होतो. पांढऱ्या रंगामुळे चादरीवरील डाग सहज दिसतात. त्यात घाण शिल्लक राहत नाही.
-
पांढरा रंग मनाला शांत ठेवतो. जेव्हा एखादा थकलेला प्रवासी मुक्काम करण्यासाठी हॉटेलमध्ये येतो, तेव्हा त्याला मानसिक शांततेची गरज असते. पलंगावरील पांढरी चादर पाहून ग्राहकाचे मन शांत होते.
-
१९९० च्या आधी हॉटेलमध्ये रंगीबेरंगी चादरी वापरल्या जात होत्या. या चादरीची देखरेख करणे देखील सोपे आहे. तसेच त्यावर काही डाग लागले तरी ते दिसून येत नव्हते.
मात्र त्यानंतर एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी अनेक ग्राहकांना हॉटेलमध्ये स्वच्छता, बेड यासंबंधित काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी अनेकांनी हॉटेलच्या बेडवर पांढरी चादर असावी, याला अधिक पसंती दिली. त्यानंतर हॉटेलमध्ये पांढऱ्या रंगाच्या चादरी ठेवण्याचा ट्रेंड सुरु झाला.
हॉटेलमधील बेडवर नेहमी पांढऱ्या रंगाचीच चादर का अंथरलेली असते?; जाणून घ्या काय आहे कारण
Web Title: Why the majority of hotels use white bedding know the reason behind nrp