• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. papaya for belly fat weight loss know the amazing health benefits nrp

पोटावरील चरबी कमी करायची? मग ‘हे’ उपाय नक्की करा

August 12, 2021 15:31 IST
Follow Us
  • आरामदायी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खराब आहार यामुळे अनेक लोक लठ्ठ होत आहेत. लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार होतात.
    1/10

    आरामदायी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खराब आहार यामुळे अनेक लोक लठ्ठ होत आहेत. लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार होतात.

  • 2/10

    तज्ज्ञांच्या मते, तुमचा आहार हा लठ्ठपणा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो. लठ्ठपणा किंवा विशेषत: पोटाची चरबी कमी करणे हे खूप कठीण काम असते. पण व्यायामाबरोबरच तुमच्या आहारात बदल करून तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता.

  • 3/10

    लठ्ठपणा कमी करण्यासाठी पपई फार उपयुक्त ठरते. पपईमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्त्वे आढळतात. यात कॅलरीजही कमी प्रमाणात असतात.

  • 4/10

    पपईमध्ये ए, सी ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असता. त्याशिवाय यात फायबरही चांगल्या प्रमाणात आढळते. त्यामुळे पपई आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.

  • 5/10

    पपईमध्ये असलेले अनेक पोषक घटक पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्ही पोटाची चरबी दूर करण्यासाठी पपई आहारात समावेश करु शकता.

  • 6/10

    सॅलेड – तुम्ही जेवताना सॅलेड म्हणून पपई खाऊ शकता. पपईमुळे पचनक्रिया सुधारते. त्यासोबतच पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही.

  • 7/10

    पपईचा रस: पपईचा रस आरोग्यासाठी खूप चांगला आहे. त्याचे नियमित सेवन केल्याने तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते.

  • 8/10

    ओटमील: सकाळी न्याहारीदरम्यान ओटमीलसोबत पपईचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास खूप मदत होते.

  • 9/10

    विविध कडधान्य : पपई व्यतिरिक्त पोटाची चरबी कमी करण्यासाठी विविध कडधान्य देखील प्रभावी ठरतात. त्यांचे सेवन केल्याने दीर्घकाळ भूक लागत नाही, तसेच स्नायू मजबूत राहतात. बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने ते पोटातील चरबी कमी करण्यास मदत करतात.

  • 10/10

    धने : पोटाची चरबी कमी करण्यासाठी धने फार फायदेशीर समजले जाते. यात कॅल्शियम, व्हिटॅमिन-सी आणि मोठ्या प्रमाणा फायबर आढळते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही धनेमिश्रित पाणी पिऊ शकता.

Web Title: Papaya for belly fat weight loss know the amazing health benefits nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.