-
हवामान बदलाचा परिणाम आरोग्याप्रमाणे त्वचेवरही दिसून येतात. अनेकदा थंडीत किंवा उन्हाळ्यात काही लोकांच्या पायांना भेगा पडतात. यामुळे पाय दुखणे, भेगांमधून रक्त येणे, पायाची आग होणे, पाय जळजळणे यासह विविध समस्यांना सामोरे जावं लागतं.
-
पायाच्या भेगा या वेदनादायी असतात. जर तुमच्याही पायांना भेगा पडत असतील तर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे या भेगा पडायला सुरुवात झाल्यावर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
-
तसेच जर तुमच्याही पायांना भेगा पडत तर तुम्ही काही घरगुती उपाय करुन ही समस्या दूर करु शकता.
-
तुमचे पाय हे कायम स्वच्छ ठेवावेत. ते धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाण्याने धुवा.
-
भेगा पडलेल्या ठिकाणी रात्री ग्लिसरिन लावून पायमोजे घालून झोपा. त्यानंतर सकाळी गार पाण्याने पाय धुवा.
-
तसेच आंघोळीच्या आधी कोमट पाण्यात व्हिनेगर घालून त्या पाण्यात पाय बुडवून ठेवा.
-
अॅपल साइडर व्हिनेगर हे पायांना पडलेल्या भेंगासाठी उपयुक्त मानले जाते. अॅपल साइडर व्हिनेगरमध्ये लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण पायांना पडलेल्या भेगांवर लावा.
-
अंघोळ झाल्यावर मोहरीच्या तेलामध्ये थोडी हळद घालून भेगांवर लावा. त्यामुळे मोठा फायदा मिळतो.
-
उतारवयात पायाला भेगा पडण्यामध्ये प्रमुख कारण हे कोरडे हवामान आहे. कोरड्या वातावरणाचा, घर्षणाचा धुळीचा परिणाम होऊन पायाला भेगा पडतात.
-
लिंबू हे पायांना पडलेल्या भेगांवर उत्तमरित्या काम करते. जर तुमच्या पायांना भेगा पडल्या असतील तर लिंबाची साल किसून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन ती साल त्यात टाकून उकळून घ्या. हे उकळलेले पाणी कोमट झाल्यावर त्यात अॅपल सायडर व्हिनेगर घाला. त्यानंतर त्या पाण्यात १५ ते २० मिनिटे पाय घालून बसा.
-
पायांना भेगा पडल्या असतील तर दररोज रात्री खोबरेल तेल लावा.
-
हातापायांना पडलेल्या भेगा लपवण्यापेक्षा त्यावर उपचार करा.
तुमच्या पायाच्या टाचांना भेगा पडल्यात का? मग ‘हे’ उपाय नक्की करा
Web Title: Some excellent home remedies for cracked heels and dry cracked feet nrp