• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. bigg boss 13 winner actor sidharth shukla passed away at age 40 reportedly from a heart attack know symptoms signs men women causes sdn

हृदयविकाराची लक्षणं काय आणि कोणती काळजी घेतली पाहिजे; १० महत्वाचे मुद्दे

September 2, 2021 15:48 IST
Follow Us
  • Heart Attack Symptoms Signs
    1/15

    छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि 'बिग बॉस १३'चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाले आहे. वयाच्या ४०व्या वर्षी सिद्धार्थने अखेरचा श्वास घेतला आहे. सिद्धार्थचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले.

  • 2/15

    एकेकाळी हृदयविकार हा म्हातारपणी होणारा आजार समजला जायचा, मात्र आजकाल २०-३० वर्षांच्या तरुणांमध्येही हृदयविकाराचा त्रास पाहायला मिळतो. सध्या भारतात हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

  • 3/15

    भारतातील हृदयविकाराचे प्रमाण वाढण्यामागची बरीच कारणे आहेत, मात्र हा विकार होण्यामागे एक कारण सर्वाधिक जबाबदार आहे व ते म्हणजे जीवनशैलीत झालेले बदल. बऱ्याच वेळा आपण लहानसहान शारीरिक दुखापतींकडे दुर्लक्ष करतो. परंतु हेच लहान वाटणारे आजार नंतर बळावतात. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीदेखील अशीच काही दुखणी उद्भवतात. त्यामुळे वेळीच हृदयविकाराची लक्षणे ओळखणं गरजेचं आहे.

  • 4/15

    बऱ्याच वेळा छातीत दुखत असतं त्यावेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. गॅसमुळे दुखत असेल किंवा जड ओझ उचलल्यामुळे दुखत असेल असं म्हणून आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही.

  • 5/15

    परंतु हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी बऱ्याचदा छातीत दुखतं. हृदयाच्या स्नायूंना आवश्यक रक्त, प्राणवायूचा पुरवठा होत नसेल, तर हे लक्षण दिसून येते. त्यामुळे छातीत दुखायला लागल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जा.

  • 6/15

    पायांना सूज येणे किंवा पाय दुखणे

  • 7/15

    बऱ्याच वेळा अचानकपणे दरदरुन घाम फुटू लागतो. हेदेखील हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षणं आहे.

  • 8/15

    अनेक वेळा हातामध्ये, दंडामध्ये किंवा मानेमध्ये अचानकपणे वेदना जाणवते.

  • 9/15

    हृदयविकाराचा झटका येण्याच्या लक्षणांमध्ये हे एक लक्षण आहे. बऱ्याच वेळा अचानकपणे चक्कर येते.

  • 10/15

    अचानकपणे पोटात दुखणे

  • 11/15

    काहींना उलटीदेखील होते.

  • 12/15

    अनेकदा तिखट किंवा तेलकट पदार्थ खालल्ल्यामुळे छातीत जळजळल्याची समस्या निर्माण होते.

  • 13/15

    परंतु काही वेळा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी छातीत जळजळ होते.

  • 14/15

    ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा किंवा उच्च कोलेस्टेरॉल, बीपी, मधुमेह, लठ्ठपणा किंवा हृदयाशी संबंधित समस्यांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या अशा व्यक्तीने नियमितपणे हृदय तपासणी केली पाहिजे.

  • 15/15

    लक्षणे दिसण्यापूर्वी २ डी इको आणि टीएमटी यासारख्या चाचण्या हृदयाच्या अडथळ्याचे निदान करण्यात मदत करू शकतात.

Web Title: Bigg boss 13 winner actor sidharth shukla passed away at age 40 reportedly from a heart attack know symptoms signs men women causes sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.