-

'रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा,' हे वाक्य आपण अनेकदा गणपतीची आरती करताना उच्चारतो. यातील प्रत्येक वाक्य हे गणपतीच्या विविध रुपाचे वर्णन करते.
-
गणांचा अधिपती म्हणजेच गणपती. हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्वच कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते.
-
आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरी सजावटीची लगबग पाहायला मिळत आहे.
-
मखर, हार, फुलं, डेकोरेशन, कंठी, मुकुट यासारख्या विविध गोष्टींची तयारी प्रत्येकाकडे पाहायला मिळत आहे.
आपण गणपतीचे दर्शन घ्यायला जाताना किंवा गणपतीची पुजा करतेवेळी दुर्वा घ्यायला अजिबात विसरत नाही. -
गणपतीला दुर्वांची जुडी वाहतात. त्यामुळे गणपती प्रसन्न होतो, असे म्हटले जाते.
-
गणपतीला दुर्वा खूपच प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीची पुजा करतेवेळी बाप्पाला २१ दुर्वांची मिळून केलेली जुडी अर्पण केली जाते.
-
पण गणपतीला दुर्वा नक्की का वाहतात? याचे कारणही खास आहे.
-
गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते.
-
ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती.
-
अनल अर्थात अग्नी. त्यानंतर सर्व देवतांनी विनंती केल्यानंतर गणपती बाप्पाने त्या असुराला गिळून टाकले.
-
मात्र त्यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या.
-
तर कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यासाठी दिली.
-
यानंतर बाप्पाच्या पोटात होणारी जळजळ कमी झाली.
यापुढे भविष्यात जो कुणी मला दुर्वा अर्पण करेल, त्याला हजारो यज्ञ, व्रते, दान आणि तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणपती बाप्पाने सांगितले. -
याच कारणामुळे गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
-
विशेष म्हणजे दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकार झाल्यास दुर्वांचा वापर केला जातो.
-
मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक ठरतो.
गणपतीला दुर्वा का वाहतात? जाणून घ्या नेमकं कारण
Web Title: Ganpati festival 2021 why durva is important for ganpati nrp