• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. diwali special rangoli designs see this easy attractive rangoli designs to celebrate happy diwali 2021 latest diwali rangoli designs images photos pictures social media photos prp

Diwali Rangoli Designs 2021: झटपट काढा ‘या’ सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन

यंदाच्या वर्षी १ नोव्हेंबर पासून दिवाळी सणाला सुरूवात होतेय. दिवाळीचा सण रांगोळीशिवाय अपूर्णच. म्हणून यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्ताने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत झटपट पद्धतीने, सोप्पी आणि सुंदर रांगोळीसाठी काही खास डिझाइन्स…

Updated: October 31, 2021 21:29 IST
Follow Us
  • दिवाळी सणाला सुरूवात होतेय. दिवाळीचा सण रांगोळीशिवाय अपूर्णच. म्हणून यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्ताने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत झटपट पद्धतीने, सोप्पी आणि सुंदर रांगोळीसाठी काही खास डिझाइन्स…
    1/15

    दिवाळी सणाला सुरूवात होतेय. दिवाळीचा सण रांगोळीशिवाय अपूर्णच. म्हणून यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्ताने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत झटपट पद्धतीने, सोप्पी आणि सुंदर रांगोळीसाठी काही खास डिझाइन्स…

  • 2/15

    ही रांगेळी तुम्ही दाराच्या पट्टीजवळून काढू शकता. या डिझाईनमधली रांगोळी तुमच्या दाराला आणखी आकर्षक करेल.

  • 3/15

    जर तुम्हाला रांगोळीमध्ये काहीतरी वेगळं आणि पण सहज जमेल अशी रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळी एकदा नक्की ट्राय करा.

  • 4/15

    संस्कार भारती रांगोळी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. रांगोळी ही केवळ सजावटीची गोष्ट नसून यातुन येणाऱ्या लहरींनी सकारत्मक वातावरण निर्माण होते अशी ही मान्यता आहे, यामुळे दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये आकर्षक संस्कार भारती रांगोळी विसरून चालणार नाही.

  • 5/15

    पूर्वी घरे मोठी असल्याने रांगोळीसाठी मोठी जागा मिळत होती. मात्र आता जागेच्या अभावी कॉम्पॅक्ट रांगोळीला प्राधान्य दिलं जातं. यासाठी ज्यांच्या दारावर कमी जागा आहे, तिथे अशी रांगोळी काढू शकता.

  • 6/15

    ही कलरफुल रांगोळी घरी आलेल्या पाहूण्याचं मन अगदी प्रफुल्लीत करेल. अगदी सोपी आणि कमी वेळेत ही रांगोळी तुम्ही काढू शकता.

  • 7/15

    दाराच्या पट्टीवर अनेक जण बाराजात येणारे प्लॅस्टिकचे स्टिकर लावतात. पण त्याऐवजी अशाच पट्टीतली रांगोळी काढली तर तुमच्या दाराची सजावट आणखी आकर्षक होईल.

  • 8/15

    ज्याप्रमाणे सजावटीसाठी दारासमोर रांगोळी महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे तुमचा जिना सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. तुमच्या जिन्यावर अशा प्रकारची रांगोळी काढून येणाऱ्या पाहूण्याचं स्वागत करू शकता.

  • 9/15

    मोठी रांगोळी काढायची म्हणजे सराव पाहिजे आणि वेळ सुद्धा… पण ज्यांच्याकडे वेळ नाही आणि सराव सुद्धा नाही, त्यांना ही रांगोळी अगदी सोयीची ठरले.

  • 10/15

    कमी जागेत काहीतरी वेगळं करायची इच्छा असेल तर ही रांगोळी तुमच्या उपयोगाची ठरेल. यात दिव्यांचा वापर केल्यामुळे दारासमोर दिव्यांचा लखलखाट रांगोळीला आणखी आकर्षक करेल.

  • 11/15

    ज्यांना रांगोळीमध्ये नवे नवे प्रयोग करायीच आवड असते, त्यांनी ही डिझाईन एकदा नक्की काढून पाहा.

  • 12/15

    आपली रांगोळी सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी कायमत डार्क आणि लाईट रंगांचा मेळ साधला पाहिजे. अगदी आपल्या हाताने मोठे ठिपके पाडून आणि एका बारीक काडीच्या मदतीने ही रांगोळी काढू शकता.

  • 13/15

    ज्यांच्या घरी ऐसपैस जागा असेल त्यांनी हा रांगोळीची डिझाइन काढायला काही हरकत नाही. यातली रंगसंगती अतिशय आकर्षक दिसून येईल.

  • 14/15

    रांगोळी ही एक सजावटीपुरती गोष्ट नसून त्यामागे अनेक धार्मिक अर्थ देखील लपले आहेत. असं म्हणतात की रांगोळीतील रंग आणि आकार हे मनाला सकारात्मक बनवण्यात मदत करतात. त्यामुळे अशी रांगोळी सुद्धा तुमच्या घराला अधिकाधिक सुंदर बनवेल.

  • 15/15

    ही रांगोळी तुम्ही चाळणीच्या मदतीने आधी रंग भरून त्यावर बोटाच्या मदतीने डिझाइन काढू शकता. या रांगोळीला वेळ सुद्धा कमी लागतो. (ALL PHOTOS: Instagram/rangolibysakshi)

Web Title: Diwali special rangoli designs see this easy attractive rangoli designs to celebrate happy diwali 2021 latest diwali rangoli designs images photos pictures social media photos prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.