• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why does pizza come with a small table history of pizza saver explains what is pizza saver prp

तुम्हाला माहितेय? पिझ्झासोबत मिळणारं छोटं टेबल नक्की काय आहे? जाणून घ्या याचा इतिहास

जर तुम्ही पिझ्झा प्रेमी असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. पिझ्झासोबत छोटा प्लॅस्टिकचा टेबल का देत असतील ? असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडला असेलच. कोणत्या कारणासाठी देतात हे छोटे टेबल? जाणून घ्या सविस्तर…

Updated: November 1, 2021 22:04 IST
Follow Us
  • जर तुम्ही पिझ्झा प्रेमी असाल तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा पिझ्झा ऑर्डर करता, त्यावेळी पिझ्झाच्या मध्यभागी एक छोटा प्लॅस्टिकचा टेबल ठेवलेला दिसला असेल.(Photo: Instagram/ madmanmario)
    1/15

    जर तुम्ही पिझ्झा प्रेमी असाल तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा पिझ्झा ऑर्डर करता, त्यावेळी पिझ्झाच्या मध्यभागी एक छोटा प्लॅस्टिकचा टेबल ठेवलेला दिसला असेल.(Photo: Instagram/ madmanmario)

  • 2/15

    पिझ्झासोबत हा छोटा प्लॅस्टिकचा टेबल का देत असतील ? आणि याचा वापर नक्की कशासाठी करायचा असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतीलच.(Photo: instagram/ pizzadistanceri.rs)

  • 3/15

    तर आज आम्ही तुम्हाला सांगतोय हा छोटा प्लास्टिक टेबल नक्की काय आहे? आणि कोणत्या कारणांसाठी हे वापरतात ? (Photo: instagram/ pizzadistanceri.rs)

  • 4/15

    कधी कधी पिझ्झाच्या बॉक्समध्ये छोट्या आकारचे टेबल व्यतिरिक्त छोटे स्टूल, छोट्या खुर्च्या सुद्धा देण्यात येत असतात. याला ‘पिझ्झा सेवर’ असं म्हटलं जातं.(Photo: instagram/ carmellaspizzagrill

  • 5/15

    याला वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. कुणी याला बॉक्स टेंट, पिझ्झा ट्रायपॉड, पिझ्झा टेबल, पिझ्झा चेअर, असं देखील म्हणतात.(Photo: instagram/ pizzadistanceri.rs)

  • 6/15

    खरं तर, बॉक्समधील पिझ्झाचे तुकडे विस्कळीत होऊ नये म्हणून हे ‘पिझ्झा सेवर’ बॉक्समध्ये पिझ्झाच्या मध्यभागी लावून दिलं जातं. (Photo: instagram/ korobki_dlya_pizzy)

  • 7/15

    ‘पिझ्झा सेवर’च्या तीन काड्या पिझ्झाच्या मधोमध लावून ठेवल्याने होम डिलिव्हरीपर्यंत पिझ्झा व्यवस्थित राहतो, हे यामागचं खरं कारण होय.(Photo: Instagram/ kurebekova )

  • 8/15

    ‘पिझ्झा सेव्हर’ प्लास्टिकचा बनलेला असतो आणि त्याला तीन पाय असतात. कधीकधी चार. ते बहुतेक वेळा पांढरे असतात. काही कंपन्या लाल रंगाचे सुद्धा देत असतात.(Photo: Instagram/ ilovehearses)

  • 9/15

    या पिझ्झा सेव्हरचा पुनर्वापर करता येत नाही. पिझ्झासाठी वापर झाल्यानंतर त्याला फेकण्याशिवाय काही पर्याय उपलब्ध नसायचा. पण हल्ली काही लोकांना याचा पुर्नवापर करण्यासाठी अनेक पर्याय सापडले आहेत.(Photo: instagram/ pizzadistanceri.rs)

  • 10/15

    १९७४ मध्ये अर्जेंटिना इथल्या क्लॉडिओ डॅनियल ट्रोग्लिया यांना या प्लॅस्टिकच्या तीन पायांच्या स्टूलसाठी पेटंट जारी करण्यात आलं होतं. (Photo: instagram/ pizzadistanceri.rs)

  • 11/15

    पिझ्झा बॉक्सच्या मध्यभागी बसेल आणि पिझ्झामध्ये वरच्या भागाला टेकणार नाही अशा या तीन पायांच्या छोट्या टेबलला त्यांनी ‘SEPI’ असं देखील म्हटलं. (Photo: instagram/ pizzadistanceri.rs)

  • 12/15

    त्यानंतर १९८५ मध्ये न्यू यॉर्कचे कार्मेला विटाले यांना अशाच उपकरणासाठी पेटंट जारी करण्यात आलं. विटाले यांनी त्यांच्या मॉडेलला ‘पॅकेज सेव्हर’ असं नाव दिलं. त्यानंतर त्याचं नाव बदलून त्याला ‘पिझ्झा सेव्हर’ असं नाव देण्यात आलं. कारण पिझ्झासाठीच त्याचा सर्वात जास्त वापर होऊ लागला होता.(Photo: Instagram/togetherweeatandtravel)

  • 13/15

    त्यानंतर १९८५ मध्ये न्यू यॉर्कचे कार्मेला विटाले यांना अशाच उपकरणासाठी पेटंट जारी करण्यात आलं. विटाले यांनी त्यांच्या मॉडेलला ‘पॅकेज सेव्हर’ असं नाव दिलं. त्यानंतर त्याचं नाव बदलून त्याला ‘पिझ्झा सेव्हर’ असं नाव देण्यात आलं. कारण पिझ्झासाठीच त्याचा सर्वात जास्त वापर होऊ लागला होता. (Photo: Instagram/ sharmakesmehungry)

  • 14/15

    त्यानंतर याला ‘टेबल’ म्हणून नाव दिलं. यासाठी २०१८ साली बोस्टन पिझ्झाने कॅनडामध्ये एक प्रचारात्मक मोहीम सुद्धा राबवली. त्यांनी या ‘पिझ्झा टेबल’ला पॅटिओ सेटमध्ये रूपांतरित केलं आणि टेबला शेजारी लहान प्लास्टिकच्या खुर्च्या जोडल्या.(Photo: Instagram/ lumensky007)

  • 15/15

    पिझ्झा खाऊन झाल्यानंतर अनेकजण हे छोटे टेबल फेकून देत होत. पण हल्ली अनेकजण याचा अनेक गोष्टींसाठी वापर करत असतात. असे अनेक छोटे टेबल जमा करून कुणी टाकाऊपासून टिकाऊच्या वस्तू देखील बनवतात.(Photo: Instagram/robbynbobbyn)

Web Title: Why does pizza come with a small table history of pizza saver explains what is pizza saver prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.