-
स्मार्ट फोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही यासाठी इंटरनेट अत्यावश्यक आहे. सर्वाधिक स्पीड असलेलं नेटवर्क कोणतं? यापासून ब्रॉडबँड कोणता घ्यावा यासाठी विचार केला जातो. मात्र चांगल्या स्पीडचं नेट घेतलं तरी बहुतेक वेळा सिग्नल मिळत नाही. (Photo- Pixbay)
-
बहुतेक वेळा राउटरबाबत तक्रारी केल्या जातात. मात्र अनेकदा राउटर चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने सिग्नलमध्ये अडचणी येतात. त्यामुळे राउटर योग्य ठेवल्यास आपल्याला नक्कीच फायदा होईल. (Image Source: Xiaomi)
-
तुम्हाला वाय-फाय राउटरवरून मिळणारा वेग धातू किंवा काँक्रीटसारख्या भिंतीच्या आवरणामुळे प्रभावित होतो. त्यामुळे वाय-फाय राउटरच्या मार्गात कोणतेही अडथळे नसल्याची खात्री करा. तसेच हे राऊटर जमिनीवर ठेवणे टाळावे. (Reuters)
-
राउटर अशा ठिकाणी ठेवू नका जिथे आधीच भरपूर सामान आहे. वाय-फाय राउटरजवळ कोणतीही धातूची वस्तू नसावी, कारण याचा सिग्नलवर परिणाम होतो. (Photo- Financial Express)
-
वाय-फाय राउटर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅझेटजवळ ठेवू नका. टीव्ही, बेबी मॉनिटर, ब्लूटूथ हेडसेट, फ्रीज यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून राउटर दूर ठेवा. तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगले सिग्नल मिळतील. (Image: Xiaomi India Twitter Handle)
-
राउटरमध्ये बाहेरील बाजूस अँटेना असतात, जे सिग्नल सुधारण्यासाठी समायोजित केले जाऊ शकतात. कधीकधी हे अँटेना झुकलेले असतात, सरळ असल्यास सिग्नल चांगला मिळतो. (Source: Netgear)
Tips And Trick: चांगल्या इंटरनेट सिग्नलसाठी या जागेवर ठेवा वाय-फाय राउटर
बहुतेक वेळा राउटरबाबत तक्रारी केल्या जातात. मात्र अनेकदा राउटर चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने सिग्नलमध्ये अडचणी येतात.
Web Title: Wi fi router in place for better internet signal rmt