• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you know who got the first aadhaar card in india rmt

Photo: भारतात पहिलं आधारकार्ड कोणाचं बनलं माहिती आहे का?, जाणून घ्या

भारतात आज ९० टक्क्याहून अधिक लोकांकडे आधारकार्ड आहे.

Updated: December 6, 2021 15:52 IST
Follow Us
  • भारतात आज ९० टक्क्याहून अधिक लोकांकडे आधारकार्ड आहे. आधारकार्ड योजना आल्यानंतर पहिलं आधारकार्ड कुणाचं काढलं असेल? हा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेलच.
    1/10

    भारतात आज ९० टक्क्याहून अधिक लोकांकडे आधारकार्ड आहे. आधारकार्ड योजना आल्यानंतर पहिलं आधारकार्ड कुणाचं काढलं असेल? हा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेलच.

  • 2/10

    आधार कार्डचे कामकाज यूपीए सरकारच्या काळात लागू करण्यात आले होते. आधार प्रकल्पाचे नेतृत्व इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी करत होते. आधार कार्डच्या आगमनाने भारतात अनेक बदल घडून आले आहेत. आधार हा व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा आहे.

  • 3/10

    आधार कार्डमुळे देशात पारदर्शकता दिसून आली असून अनेक सरकारी कामांमध्येही सुधारणा झाली आहे. विविध सरकारी योजना, बँकिंगशी संबंधित काम, नोकऱ्या इत्यादींमध्ये आपल्याला आधार कार्डाची विशेष गरज आहे.

  • 4/10

    जानेवारी २००९ मध्ये, भारत सरकारने युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना केली.

  • 5/10

    या प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर सप्टेंबर २०१० पासून आधार कार्ड बनविण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर भारतातील लोकांचे आधार कार्ड मोठ्या प्रमाणावर बनवून त्यांना वितरित केले जाऊ लागले.

  • 6/10

    भारतातील पहिल्या आधार कार्डबद्दल बोललो, तर देशातील पहिले आधार कार्ड २९ सप्टेंबर २०१० रोजी रंजना सोनवणे यांनी बनवले होते. (Photo- Indian Express)

  • 7/10

    रंजना ही महाराष्ट्रातील महिला आहेत. त्या काळात त्यांचे वास्तव्य महाराष्ट्रातील नंदुबार जिल्ह्यातील तांबळी येथे होते.

  • 8/10

    यूपीए सरकारच्या काळात महाराष्ट्रातील नंदुबार जिल्ह्यातील तांभाली गावातून आधार कार्ड बनवण्याची सुरुवात झाली. पहिले आधार कार्ड सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत रंजना सोनवणे यांना देण्यात आले.

  • 9/10

    रंजना सोनवणे या भारतातील पहिले आधार कार्ड मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.

  • 10/10

    भारतात मोठ्या संख्येने लोकांकडे त्यांचे आधार कार्ड आहे. शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या सर्वांना याची गरज आहे. आधार कार्ड आल्याने देशात पारदर्शकता आली आहे.

TOPICS
आधार कार्डAadhar Card

Web Title: Do you know who got the first aadhaar card in india rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.