• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. benefits of pomegranate juice drink one glass daily in winter scsm

हिवाळ्यात डाळिंबाचा रस पिणं आरोग्यवर्धक, जाणून घ्या फायदे

डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण थंडीच्या काळात शरीर आतून उबदार राहते.

February 3, 2022 17:20 IST
Follow Us

डाळिंबाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचे सेवन कोणत्याही ऋतूत केले जाऊ शकते, परंतु हिवाळ्यात डाळिंब खाल्ल्याने किंवा डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीर अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. डाळिंबात असे अनेक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदे देतात.

  • ज्या लोकांना रक्तदाबाची तक्रार आहे, त्यांनी दररोज विशेषतः थंडीच्या दिवसात डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे. डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
    1/6

    ज्या लोकांना रक्तदाबाची तक्रार आहे, त्यांनी दररोज विशेषतः थंडीच्या दिवसात डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे. डाळिंबाचा रस प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

  • 2/6

    डाळिंबात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. रोज डाळिंबाचा रस प्यायल्याने त्वचा चमकदार होते. हे प्यायल्याने रक्त शुद्ध होते, त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि सुरकुत्या येण्याची तक्रार राहत नाही.

  • 3/6

    डाळिंबाचा रस प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. यासाठी रोज एक ग्लास डाळिंबाचा रस प्यावा. तसेच संधिवातापासून आराम मिळवण्यासाठी डाळिंबाचा रस खूप फायदेशीर आहे.

  • 4/6

    शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचनसंस्था मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत डाळिंबाचा रस सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाचा रस प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. यासोबतच पोटाशी संबंधित आजारही दूर होतात.

  • 5/6

    डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्ही डाळिंबाचा रस रोज सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. हृदयरोगींनी दररोज डाळिंबाचा रस सेवन करावा.

  • 6/6

    डाळिंबात लोहाचे प्रमाण चांगले असते त्यामुळे ते शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही. जर एखाद्याला अॅनिमियाची तक्रार असेल तर त्याने महिनाभर डाळिंबाचा रस सतत प्यावा. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते आणि शरीराचा थकवा दूर करून ऊर्जा मिळते.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Benefits of pomegranate juice drink one glass daily in winter scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.