-
Rules Changes From March: वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. (फोटो: Financial Express)
-
नवे दर आजपासून म्हणजेच १ मार्चपासून लागू झाले आहेत. (फाइल फोटो इंडियन एक्सप्रेस )
-
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) या अमूलच्या मालकीच्या कंपनीनुसार, ही वाढ १ मार्चपासून देशभरात लागू करण्यात आली आहे. (फोटो: जनसत्ता)
-
IPPB म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आपल्या डिजिटल बचत खात्यासाठी क्लोजर चार्जेस आकारण्यास सुरुवात केली आहे. (फोटो: Financial Express)
-
जर तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत बचत खाते असेल तर तुम्हाला हे शुल्क देखील भरावे लागेल. यासाठी तुम्हाला १५० रुपये अधिक जीएसटी आकारावा लागेल. (फोटो: Financial Express)
-
हा नवा नियम ५ मार्च २०२२ पासून लागू होणार आहे. (फोटो: Financial Express)
-
पेन्शनधारकांसाठी २८ फेब्रुवारी ही लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची शेवटची तारीख होती. सरकारने दिलेली ही सूट १ मार्च रोजी म्हणजेच आजपासून संपणार आहे. (फाइल फोटो इंडियन एक्सप्रेस )
-
हे लक्षात घेण्यासारखे आहे की निवृत्ती वेतन मिळणे सुरू ठेवण्यासाठी, निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर करणे अनिवार्य आहे. (फोटो: Financial Express)
-
साधारणपणे दरवर्षी ३० नोव्हेंबर ही जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख असते परंतु सरकारी निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा देत, या वर्षी ही तारीख दोनदा वाढवण्यात आली. (फोटो: Financial Express)
-
जर तुम्ही मुदतीपूर्वी जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल तर तुमचे पेन्शन थांबेल. तुम्ही घरबसल्याही लाइफ सर्टिफिकेटसादर करू शकता. यासाठी तुम्हाला डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करावे लागेल. (फोटो: Financial Express)
-
एलपीजी सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहीर केली जाते. गॅस सिलिंडरच्या किमतीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होतो. (फोटो: Indian Express)
-
अलिकडच्या अनेक महिन्यांप्रमाणे या वेळीही घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. (फोटो: Indian Express)
-
मात्र १ मार्चपासून म्हणजेच आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १०५ रुपयांनी वाढल्या आहेत. (फोटो: IndianExpress)
-
आजपासून होत असलेल्या प्रमुख बदलांपैकी एक म्हणजे DBS बँक इंडिया लिमिटेड (DBIL) आणि लक्ष्मी विलास बँक (LVB) चा IFSC कोड. (फोटो: Indian Express)
-
जुने IFSC कोड २८ फेब्रुवारी २०२२ पासून बदलण्यात आले आहेत. DBS Bank India Limited (DBIL) चे लक्ष्मी विलास बँकेत (LVB) विलीनीकरण करण्यात आले असून त्यानंतर सर्व शाखांचे IFSC आणि MICR कोड बदलले आहेत. DBIL ने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२२ पासून ग्राहकांना NEFT/RTGS/IMPS द्वारे पैशांच्या व्यवहारांसाठी नवीन DBS IFSC कोड वापरावा लागेल. (फोटो: Indian Express)
Rules Changes From March: LPG सिलेंडर ते बँकेशी संबंधित ‘हे’ नियम १ मार्चपासून बदलणार!
१ मार्चपासून एलपीजीच्या किमतीपासून ते बँकिंग नियमांपर्यंत होणाऱ्या या मोठ्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.
Web Title: Rules changes from gas cylinder price to banking rules these big changes are going to happen in march ttg