Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. womens day 2022 think of these useful options as gifts ttg

Women’s Day 2022: गिफ्ट म्हणून ‘या’ उपयुक्त पर्यायांचा नक्की करा विचार

Women’s Day 2022: या महिला दिनी उपयुक्त आणि हटके गिफ्ट्स द्या

Updated: March 7, 2022 11:14 IST
Follow Us
  • महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन. त्यामुळे जगभरात ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
    1/15

    महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन. त्यामुळे जगभरात ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

  • 2/15

    प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे.

  • 3/15

    या दिवशी मुख्यत्वेकरुन महिलांना एखादी भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. मात्र अनेक वेळा महिलांना कोणती भेटवस्तू द्यावी याविषयी पुरुषांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरातल्या स्त्रियांना एखादं गिफ्ट द्यायचं असेल तर या पर्यायांचा नक्कीच विचार करायला हवा.

  • 4/15

    सध्या नेट आर्ट आणि मॅनिक्युअर चा ट्रेंड आहे. घरीच किट उपलब्ध झाल्यास प्रत्येक वेळी सुंदर हातांसाठी पार्लरमध्ये जायची गरज नाही. कोणत्याही मुलीसाठी घरगुती मॅनिक्युअर आणि पेडीक्योर किटपेक्षा चांगली भेट काय असू शकते. चांगल्या ब्रँडची किट खरेदी करा आणि तिला गिफ्ट म्हणून द्या. (फोटो: Pixabay)

  • 5/15

    जर तुम्हाला सौंदर्य उत्पादने भेट द्यायची असतील तर तुम्ही मसाज टूल्स गिफ्ट करू शकता. चेहरा रिलॅक्स ठेवण्यासाठी आणि चेहऱ्याची चरबी कमी करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल, अनेक अभिनेत्री त्यांच्या त्वचेतील सूज आणि त्वचा घट्ट ठेवण्यासाठी मसाज साधनांचा वापर करतात. मसाजची साधने बाजारात इलेक्ट्रॉनिक किंवा रोलर इत्यादी स्वरूपात उपलब्ध आहेत, जी तुम्ही खिशात ठेऊन देऊ शकता. (फोटो: Pixabay)

  • 6/15

    स्वतःच्या स्कीनची काळजी घ्यायला महिलांना खूप आवडत. यासाठी ते वेगवेगळे उत्पादने वापरत असतात. SkinEasi Regina हे लाखो महिलांना भेडसावणार्‍या रब रॅशच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी बनवलेलं अँटी-रब-रॅश जेल आहे. या जेलमध्ये प्रोप्रायटरी प्रोटेक्टिव्ह लेयर टेक्नॉलॉजी वापरली जाते जी विशेषतः ब्रा-स्ट्रॅप रॅशेस, अंडर-ब्रा रॅशेस, कंबरेवरील पुरळ, मांडीचे पुरळ आणि सॅनिटरी पॅड रॅशेस रोखण्यासाठी प्रभावी आहे. हे जेल अॅमेझॉनवर उपलब्ध आहे. हा एक नक्कीच उत्तम गिफ्टसाठी पर्याय ठरेल.

  • 7/15

    जर जिला गिफ्ट द्यायचं आहे तिला ट्रेंडसोबत जात लूक कॅरी करायला आवडत असेल तर तिला मेकअप कॉम्बो किट भेट द्या. कॉलेजमध्ये जाणार्‍या किंवा नोकरी करणाऱ्या महिला नेहमी मेकअप करतात. आजकाल हलकासा मेकअप तरी मुली आवर्जून करतात. (फोटो: Pixabay)

  • 8/15

    सर्व महिलांना परफ्यूम आवडतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भर पडण्यास मदत होते. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्या आवडीचा सुगंध किंवा फुलांचा परफ्यूम गिफ्ट करू शकता. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही वेगवेगळ्या परफ्यूम सुगंधांचे कॉम्बो किट देखील भेट देऊ शकता. (फोटो: Pixabay)

  • 9/15

    वाढेलेली फिटनेसची क्रेझ बघता तुम्ही मुसली नक्कीच गिफ्ट म्हणून देऊ शक. बागरीज़ स्विस स्टाईल मुसली हे ब्रिटीश ओट्स, संपूर्ण धान्य गव्हाचे फ्लेक्स, पौष्टिक खजूर, कॅलिफोर्नियाचे बदाम आणि रसदार मनुका यांसारख्या प्रिमियम घटकांसह बनविलेले असते. याची ५०० ग्रॅमची किंमत ३३० रुपये आहे. हा आरोग्यपूर्ण पदार्थ उत्तम गिफ्ट ठरू शकते.

  • 10/15

    तुम्हाला ज्यांना गिफ्ट द्यायचं आहे त्यांना जर खूप फिरण्याची आवड असेल तर तुम्ही लगेज बॅग गिफ्ट देऊ शकता. सध्या साक्यबॅगच्या बॅग त्याच्यालुकमुळे खूप ट्रेण्डमध्ये आहेत. Skybags Trooper ही लगेज बॅग कूल ब्लू आणि हॉट रेड रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या बॅग अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. याची सुरवातीची किंमत ३,०७९ आहे.

  • 11/15

    कोणत्याही सणाला किंवा उत्सवाच्या दिवशी गोड आवर्जून गिफ्ट केलं जात. नेहमीच्या मिठाईपेक्षा डोनट्स हा उत्तम पर्याय आहे. बहुचर्चित ब्रँड मॅड ओव्हर डोनट्सने खास महिला दिनानिमत्त ऑफरही दिली आहे. मंगळवार, ८ मार्च २०२२ रोजी तुमची आई, सासू किंवा आजी यांना त्यांच्या वयानुसार टक्केवारीची सूट त्यांच्या काही अटीनुसार दिली जाणार आहे.

  • 12/15

    अनेक महिलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे आइस्क्रीम. त्यांना आवडत असलेले फ्लेवर्स किंवा काही हटके फ्लेवर्सचं आईस्क्रीम तुम्ही नक्की त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकता. वेगवेगळे फ्लेअर्स चे पॅक एकत्र करून गिफ्ट देऊ शकता. सुप्रसिद्ध ब्रँड नॅचरल्स आईस्क्रीम यंदाचा महिला दीन खास बनवण्यासाठी मलबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी आणि गूसबेरी अशा फ्लेवर्सची आईस्क्रीम उपलब्ध करून देत आहे. नॅचरल्स आईस्क्रीम फॅमिली पॅक ३७५ रुपयांपर्यंत मिळतो.

  • 13/15

    ब्यूटी इलेक्ट्रॉनिक उत्पादने हा एक उत्तम पर्याय असू शकतो. महिला रोजच्या आयुष्यात अनेक असे ब्यूटी इलेक्ट्रॉनिक उत्पादने वापरत असतात. त्यामुळेच हे एक बेस्ट गिफ्ट ठरू शकते. (फोटो: Freepik)

  • 14/15

    महिला दिन खरंच प्रत्येक स्त्रीचं महत्त्व सांगतो. भेटवस्तूंचा विचार केला तर ती भेट छोटी असो वा मोठी, छान वाटते. काहीवेळा एखाद्या खास व्यक्तीला खास संदेशासह कॉफी मग भेट देणे ही चांगली कल्पना असू शकते. खास महिलांसाठी महिला दिनानिमित्त खास संदेश असलेला कॉफी मग घ्या आणि द्या. (फोटो: Pixabay)

  • 15/15

    फुल हा पर्याय नेहमीचं बेस्ट असतो. वरती दिलेल्या कोणत्याही गोष्टी न घेता तुम्ही फुलांचा गुच्छ गिफ्ट म्हणून देऊ शकता. (फोटो: Pixabay)

TOPICS
महिला दिन २०२५Womens Day 2025

Web Title: Womens day 2022 think of these useful options as gifts ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.