• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 2 years on coronas first lockdown two years ago looking back what did india lose scsm

Photo: दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी लागला होता पहिला जनता कर्फ्यू!

२०१९ ला चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर जगभर पसरला. जगभरातील एकेक देशांमध्ये लॉकडाऊन लागायला सुरुवात झाली. भारतातही लॉकडाऊनच्या आधीची पायरी ही जनता कर्फ्युला आहे. या कर्फ्यूला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत.

March 22, 2022 14:09 IST
Follow Us

करोनाच्या महामारीच्या रूपानं अनेक दशकातील सर्वात मोठं संकट जगासमोर आलं आणि अवघं जग ठप्प झालं. २०१९ ला चीनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर जगभर पसरला. जगभरातील एकेक देशांमध्ये लॉकडाऊन लागायला सुरुवात झाली.भारतातही लॉकडाऊनच्या आधीची पायरी ही जनता कर्फ्युला आहे. या कर्फ्यूला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात भारतामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या, देशातल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

  • देशातील आरोग्य व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रकारे सेवा देऊ शकत नाही हे अधोरेखित झालं. अनेक नागरिकांना कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये उपचाराविना आपला जीव गमवावा लागला. (photo credit: indian express)
    1/12

    देशातील आरोग्य व्यवस्था सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रकारे सेवा देऊ शकत नाही हे अधोरेखित झालं. अनेक नागरिकांना कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये उपचाराविना आपला जीव गमवावा लागला. (photo credit: indian express)

  • 2/12

    करोना काळात एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे कोरोनाच्या उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांचा उपचार या सर्व गोष्टींच्या खर्चात सामान्य लोकं अडकले. पैशाच्या अभावी अनेकांना उपचार मिळाले नाहीत आणि त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. (photo credit: file photo)

  • 3/12

    दुसऱ्या लाटेतही हीच परिस्थिती कायम राहिली. दुसऱ्या लाटेच्या वेळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना रुग्णालयामध्ये तसेच रुग्णालयाच्या बाहेर जीव सोडावा लागला. याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि केरळला बसला.(photo credit: indian express)

  • 4/12

    या महामारीमुळे अनेकजणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात प्रेतांच्या विल्हेवाटासाठी स्मशानभूमीही अपुर्‍या पडायला लागल्या.(photo credit: indian express)

  • 5/12

    करोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वाधिक फटका हा स्थलांतरीत मजुरांना बसला. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अचानकपणे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मुंबईतील लाखो मजुरांची उपासमार सुरू झाली. त्यांना धड काही खायला मिळेना आणि धड गावाकडे जायला गाड्या मिळेनात. photo credit: indian express)

  • 6/12

    तसेच वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेल्वे आणि वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आल्याने या मजुरांची चांगलीच गोची झाली. जे मजूर इतर स्थलांतरित नागरिक जिथे राहतोय तिथले भाडे परवडेना, कुटुंबांना भाजी-पाला दूरच पण अगदी दूधही मिळेना अशी अवस्था झाली. (photo credit: indian express)

  • 7/12

    करोना काळात सर्वच सेवा ठप्प झाल्याने कडक लॉकडाऊन लागले. मात्र याचा सर्वाधिक फटका आपलया शेतकरी बांधवांना लागला. कारण शेतात पिकवलेल्या उत्पादनाचं काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांचासमोर उभा राहिला होता.

  • 8/12

    वाहतुकीच्या अभावी कोणतेच पीक बाजारामध्ये पोहचत नव्हतं, त्यामुळे सर्वच पीक ही शेतात जागेवरच कुजून लागले. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे यामुळे मोठं संकट उभं राहिलं. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या करोना काळात मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं.

  • 9/12

    लॉकडाऊन लागल्यानंतर काहीच दिवसांमध्ये अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकून कर्मचारी संख्या कमी केली. तसेच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी घट केली.

  • 10/12

    लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वात मोठा परिणाम झाला तो देशातील व्यवसायांवर. देशातील अनेक छोटे मोठे व्यवसाय या काळात बंद झाले.(photo credit: indian express)

  • 11/12

    करोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत अनेकांनी आपले जवळचे व्यक्ति गमावले. या दिवसांमध्ये करोनाची दहशतच इतकी होती की त्यामुळे शेजारी हा शेजाऱ्याच्या मदतीला जात नव्हता. (photo credit: file photo)

  • 12/12

    लॉकडाऊन लागल्यानंतर याचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. या काळात देशाची जीडीपी हा नकारात्मक गेला आणि देशाची अर्थव्यवस्था पार कोलमडली. कृषी, व्यापार आणि सेवा ही तीनही क्षेत्रं ठप्प झाली. (photo credit: indian express)

TOPICS
कोव्हिड १९Covid 19लाइफस्टाइल न्यूजLifestyle NewsलॉकडाउनLockdown

Web Title: 2 years on coronas first lockdown two years ago looking back what did india lose scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.