Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. from april 1 these rules regarding banking and taxes will be changed pvp

१ एप्रिलपासून बँकिंग, टॅक्सशी संबंधीत नियमांमध्ये होणार बदल; जाणून घ्या काय होणार परिणाम

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक बदल होणार आहेत. पोस्ट ऑफिसपासून बँकिंग आणि गुंतवणुकीपर्यंत अनेक नियमांचा यात समावेश आहे.

March 30, 2022 11:51 IST
Follow Us
  • नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक बदल होणार आहेत.
    1/15

    नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक बदल होणार आहेत.

  • 2/15

    पोस्ट ऑफिसपासून बँकिंग आणि गुंतवणुकीपर्यंत अनेक नियमांचा यात समावेश आहे. मात्र या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढू शकतात.

  • 3/15

    १ एप्रिलपासून घर घेणेही महाग होणार आहे. केंद्र सरकार घर खरेदीदारांना कलम ८०ईईए अंतर्गत कर सूट देणे बंद करणार आहे.

  • 4/15

    १ एप्रिलपासून औषधेही महागणार आहेत. पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरस अशा अनेक औषधांच्या किमती १० टक्क्यांहून अधिक वाढणार आहेत.

  • 5/15

    सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यामुळे १ एप्रिलला सरकार घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

  • 6/15

    १ एप्रिल २०२२ पासून पोस्ट ऑफिसच्या काही योजनांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.

  • 7/15

    या नियमांनुसार, आता ग्राहकांना टाइम डिपॉजिट खातं, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करण्यासाठी बचत खाते किंवा बँक खाते उघडावे लागेल.

  • 8/15

    अ‍ॅक्सिस बँकेने बचत खात्यासाठी मासिक मर्यादा १० हजार रुपयांवरून १२ हजार रुपये केली आहे. बँकेचे हे नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील.

  • 9/15

    पीएनबीने घोषणा केली आहे की, ४ एप्रिलपासून पॉझिटीव्ह पे प्रणाली लागू करणार आहे.

  • 10/15

    पॉझिटीव्ह पे प्रणाली अंतर्गत, पडताळणीशिवाय चेक पेमेंट शक्य होणार नाही. १० लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी हा नियम अनिवार्य आहे.

  • 11/15

    केंद्र सरकार १ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू करणार आहे. पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते, ज्यावर कर देखील आकारला जाईल.

  • 12/15

    नियमांनुसार, ईपीएफ खात्यात २.५ लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जात आहे. याच्या वर योगदान दिल्यास व्याज उत्पन्नावर कर आकारला जाईल.

  • 13/15

    केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने जीएसटीअंतर्गत ई-इनव्हॉइस जारी करण्यासाठी उलाढाल मर्यादा ५० कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून २० कोटी रुपये केली आहे.

  • 14/15

    १ एप्रिलपासून सरकार व्हर्च्युअल डिजिटल अ‍ॅसेट (VDA) किंवा क्रिप्टोवरही ३० टक्के कर आकारणार आहे.

  • 15/15

    याशिवाय, जेव्हा जेव्हा क्रिप्टो मालमत्ता विकली जाते, तेव्हा त्याच्या विक्रीतून १% टीडीएस देखील कापला जाईल. (Photos : Financial Express)

TOPICS
जीएसटीGSTटॅक्सTaxपीपीएफPPFबँकिंगBanking

Web Title: From april 1 these rules regarding banking and taxes will be changed pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.