• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these are the best options for financial investment know more details pvp

Photos : आर्थिक गुंतवणुकीसाठी ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय; जाणून घ्या अधिक तपशील

गुंतवणूक कुठे करावी आणि किती करावी याबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. प्रत्येकाला याबाबत शंका असतात.

Updated: April 5, 2022 13:20 IST
Follow Us
  • पैशांचे महत्त्व आपण सर्वच जाणतो. म्हणूनच जितक्या लवकर आणि जितके जास्त पैसे बचत करता येतील तितके चांगले. कारण अडचणीच्या प्रसंगी आपण साठवलेले पैसेच आपल्या कामी येतात.
    1/17

    पैशांचे महत्त्व आपण सर्वच जाणतो. म्हणूनच जितक्या लवकर आणि जितके जास्त पैसे बचत करता येतील तितके चांगले. कारण अडचणीच्या प्रसंगी आपण साठवलेले पैसेच आपल्या कामी येतात.

  • 2/17

    व्यावसायिक जगात पाऊल ठेवताच आपण आपल्या भविष्यासाठी नियोजन करायला सुरुवात करायला हवी. तुमचा पहिला पगार किंवा इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नापासूनच गुंतवणूक सुरू करणे शहाणपणाचे आहे.

  • 3/17

    पण पहिली गुंतवणूक कुठे करावी आणि किती करावी याबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. प्रत्येकाला याबाबत शंका असतात. आज आपण जाणून घेऊया गुंतवणुकीची सुरुवात कुठून आणि कशी करावी.

  • 4/17

    विमा (इंश्युरन्स) : तरुणांनी प्रथम विम्यावर भर द्यावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आरोग्य विमा, जीवन विमा आणि मुदत योजना (टर्म प्लॅन) या तिन्ही विमा योजनांमध्ये गुंतवणूक करावी.

  • 5/17

    विमा लवकर सुरू करण्याचा फायदा हा आहे की तो कमी प्रीमियममध्ये चांगले कव्हरेज देतो.

  • 6/17

    म्युच्युअल फंड : तुम्ही एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू करू शकता.

  • 7/17

    एसआयपी लवकर सुरू केल्याने, आयुष्यातील एका टप्प्यावर तुमच्याकडे चांगली रक्कम जमा झालेली असेल. मिळकत वाढल्यास, SIP मधील गुंतवणूक देखील वाढवा.

  • 8/17

    पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) : नोकरी सुरू होताच निवृत्तीचे नियोजनही सुरू केले पाहिजे आणि त्यासाठी सर्वोत्कृष्ट योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. यालाच पब्लिक प्रोविडेंट फंड (PPF) असेही म्हणतात.

  • 9/17

    पीपीएफच्या माध्यमातून तुम्ही कमी वेळेत चांगला निधी गोळा करू शकता. तुम्हाला पीपीएफमधील गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभही मिळतो.

  • 10/17

    आवर्ती ठेव (Recurring Deposit) : तुम्ही एसआयपी सारखे आरडी देखील सुरू करू शकता. रिकरिंग डिपॉझिटच्या मदतीने तुम्ही अल्प मुदतीच्या लक्ष्यांसाठी पैसे गोळा करू शकता.

  • 11/17

    दर महिन्याला तुमच्या बँक खात्यातून एक निश्चित रक्कम कापून तुमच्या आरडी खात्यात जमा केली जाते. याद्वारे तुम्ही वार्षिक विम्याचा हप्ता किंवा इतर कोणतेही आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करू शकता.

  • 12/17

    फिक्स्ड डिपॉजिट (FD) : मुदत ठेव हा देखील सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. तुम्ही कोणतीही जोखीम न घेता गुंतवणूक करू शकता.

  • 13/17

    इतर योजनांच्या तुलनेत यामधील परतावा कमी असला तरी, अल्पकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

  • 14/17

    आपत्कालीन निधी : आपत्कालीन निधी तयार करण्याचे सुनिश्चित करा आणि जितक्या लवकर तुम्ही ते सुरू कराल तितके चांगले.

  • 15/17

    कारण आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. अशा परिस्थितीत आपत्कालीन निधी खूप उपयुक्त आहे.

  • 16/17

    या फंडाचा फायदा असा आहे की तुम्हाला तुमच्या इतर बचत योजनांमध्ये छेडछाड करण्याची गरज नाही. आपत्कालीन निधी तुमच्या उत्पन्नाच्या किमान ६ महिन्यांच्या समान असावा.

  • 17/17

    (सर्व फोटो : Indian Express आणि Financial Express)

TOPICS
पीएफPFपीपीएफPPFफायनान्सFinanceमराठी बातम्याMarathi News

Web Title: These are the best options for financial investment know more details pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.