-
२०२२ मधील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच शनिचरी अमावस्याही या दिवशी पडत आहे. त्यामुळे या ग्रहणाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. आंशिक सूर्यग्रहण असल्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही, परंतु यादरम्यान काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा नुसकान होऊ शकते.
-
हे ग्रहण ३० एप्रिलच्या मध्यरात्री १२.१५ पासून सुरू होईल आणि पहाटे ०४.०८ पर्यंत राहील.
-
ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे यावेळी कोणतेही शुभ कार्य करू नये.
-
ग्रहण काळात प्रवास करणे टाळावे.
-
. विशेषत: गरोदर महिलांनी यावेळी चाकू-कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरू नये, या वस्तू हातात घेऊ नये.
-
सूर्यग्रहण काळात अन्न शिजवू नका, कापण्याचे आणि सोलण्याचे काम करू नका किंवा अन्न खाऊ नका.
-
ग्रहण काळात सुईमध्ये धागा घालण्यास मनाई आहे.
-
या काळात महिलांनी कपडे शिवू नये.
-
सूर्यग्रहणाच्या वेळी तुळशीला अजिबात हात लावू नये. ग्रहणानंतर सर्व झाडांवर गंगाजल शिंपडून त्यांना शुद्ध करा. यावेळी देवांना स्पर्श करणे देखील अशुभ मानले जाते.
Surya Grahan 2022 : सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही करू नका हे काम, अन्यथा नुकसान होऊ शकतं
२०२२ मधील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच शनिचरी अमावस्याही या दिवशी पडत आहे.
Web Title: Avoid doing these things during surya grahan prp