• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. consumption of these spices can be harmful in summer pvp

Photos : उन्हाळ्यात ‘या’ मसाल्यांचे सेवन ठरू शकते हानिकारक; आजच आहारातील प्रमाण करा कमी

सर्वच मसाले प्रत्येक ऋतूमध्ये तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतीलच असे गरजेचे नाही. असेही काही मसाले आहेत जे उन्हाळ्यात खाणे टाळावेत.

May 3, 2022 21:10 IST
Follow Us
  • अन्नाची चव वाढवण्यासाठी स्वयंपाक करताना आपण वेवेगळ्या मसाल्यांचा वापर करतो. अन्नाची चव वाढवण्यासोबतच मसाल्यांचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
    1/10

    अन्नाची चव वाढवण्यासाठी स्वयंपाक करताना आपण वेवेगळ्या मसाल्यांचा वापर करतो. अन्नाची चव वाढवण्यासोबतच मसाल्यांचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.

  • 2/10

    परंतु सर्वच मसाले प्रत्येक ऋतूमध्ये तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतीलच असे गरजेचे नाही. असेही काही मसाले आहेत जे उन्हाळ्यात खाणे टाळावेत.

  • 3/10

    तथापि, कमी प्रमाणात या मसाल्याचे सेवन केल्यास तर शरीरास अपाय होण्याची शक्यता कमी असते. मात्र जर या मसाल्यांनी बनवलेले अन्न जास्त प्रमाणात खाल्ले तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

  • 4/10

    आज आपण जाणून घेऊया, असे कोणते मसाले आहेत, ज्यांच्या जास्त सेवनामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.

  • 5/10

    हळद : हळद ही आपल्या शरीरासाठी चांगली आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण जर तिचा जास्त प्रमाणात वापर केला तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

  • 6/10

    विशेषत: महिलांनी मासिक पाळीत हळदीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. असे न केल्यास जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो असे सांगितले जाते.

  • 7/10

    तुळस : फार कमी लोकांना हे माहित असेल की याचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब कमी होतो. याचा महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुळशीचा वापरही कमी करावा.

  • 8/10

    दालचिनी : दालचिनीचे अनेक फायदे आहेत, परंतु याचे जास्त सेवन केल्याने तोंडात फोड येऊ शकतात. तसेच, रक्तदाब कमी होऊ शकतो.

  • 9/10

    काळीमिरी : काळी मिरी बहुतेक भाज्यांमध्ये वापरली जाते. यामुळे वजनही कमी होते हे सर्वांनाच माहित आहे, पण जर एखाद्या व्यक्तीला रक्त गोठण्याची समस्या असेल तर काळी मिरी तुमच्यासाठी फायदेशीर नाही.

  • 10/10

    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो : Pixabay)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Consumption of these spices can be harmful in summer pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.