• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. indian places to visit in monsoons dpj

पावसाळ्यात या ठिकाणांना नक्की भेट द्या, पृथ्वीवर स्वर्गाचा येईल अनुभव

पावसाळ्यात या ठिकाणांना भेटी देण्यासाठी पर्यटक मोठया संख्येने गर्दी करतात

May 30, 2022 19:32 IST
Follow Us
  • पावसाळा सुरु होतोय. जर तुम्ही तुमच्या गजबजलेल्या शहरापासून दूर थोडा निवांतपणा घेण्याचा विचार करत असाल तर भारतात अशा काही जागा आहेत ज्या तुम्हाला स्वर्गसुखचा अनुभव देतील. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या.
    1/6

    पावसाळा सुरु होतोय. जर तुम्ही तुमच्या गजबजलेल्या शहरापासून दूर थोडा निवांतपणा घेण्याचा विचार करत असाल तर भारतात अशा काही जागा आहेत ज्या तुम्हाला स्वर्गसुखचा अनुभव देतील. पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या.

  • 2/6

    केरळमधील स्थित मुन्नार समुद्रसपाटीपासून १७०० मी. उंचीवर वसले आहे. इथून चहाच्या बागांचे सुंदर दर्शन घडते. पर्यटकांना येथे बोटिंगचा आनंदही घेता येतो. मुन्नार हे अत्यंत विशिष्ट डेअरी फार्मसाठी प्रसिद्ध आहे. मुन्नार आणि आसपासचे शोला जंगलात ट्रेकिंग करता येते. या जंगलात विविध प्रकारच्या पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. येथे एक छोटी नदी आणि पाण्याचा झरा देखील आहे. पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

  • 3/6

    मेघालयातील हिरवळीने नटलेले शिलॉंग शहर पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण असते. चारही बाजूला हिरवीगार झाडी, थंड वाहणारा हवा तुमचं मन मोहून टाकेल. एवढचं नाही तर पावसाळ्यात आजूबाजूला पसरणारी धुक्यामुळे ढगात चालत असल्याचा भास तुम्हाला होईल.

  • 4/6

    जर तुम्हाला समुद्र सपाटीचा आनंद घ्यायचा असेल तर आंदमान निकोबार जागा तुमच्यासाठी योग्य आहे. स्वच्छ, सुंदर आणि शांत समुद्र किनारा तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल.

  • 5/6

    कुर्ग हे कर्नाटकातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. कुर्गला भारतातील स्विझरलॅंन्ही म्हणतात. जर तुम्ही वाईन पेयाचे चाहते आहात. तर तुम्हाला कुर्ग मध्ये वेगवेगळ्या वाईनच्या चवी चाखायला मिळतील. इथे हाताने तयार केलेली वाईनही प्रसिद्ध आहे.

  • 6/6

    सगळ्यांना माहिती आहे, की दार्जिलिंगला पर्वतांची राणी म्हणतात. इथले मुख्य आकर्षण हे चहाचे मळे आहेत. लांबलांबपर्यंत पसरलेले चहाचे मळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. खास करून पावसाळ्यात याठिकाणी पर्यटकांची जास्त गर्दी असते. बाहेर पाऊस आणि हातात गरम गरम चहाचा कप याची गोष्टच निराळी आहे.

TOPICS
पावसाळा ऋतुRainy Seasonमराठी बातम्याMarathi News

Web Title: Indian places to visit in monsoons dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.