-
सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. सूर्यदेव एक राशीत जवळपास एक महिना थांबतो. त्यानंतर ते राशी परिवर्तन करतात. आज १५ जून रोजी पुन्हा एकदा सूर्यदेवाने राशी परिवर्तन केलंय.
-
सूर्य वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश केलाय. या राशीत ते जवळपास १६ जुलैपर्यंत राहतील. जेव्हा केव्हा कोणता ग्रह राशी बदल करतो, तर त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. या सूर्य राशी परिवर्तनामुळे नशीबवान ठरणाऱ्या राशीबद्दल जाणून घेऊया..
-
मिथून राशी : सूर्याचा प्रवेश याच राशीत झाला आहे. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांंमध्ये अचानक आक्रमकता दिसून येईल. चांगली फळ मिळण्यास सुरूवात होईल. या काळात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवत असाल तर तुमचा फायदा होईल. तुमच्या नेतृत्वाने लोकांना आकर्षित कराल. पण तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्ही आक्रमकता दाखवायला सुरूवात केली तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे सावधान राहा.
-
सिंह राशी : सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. म्हणून या राशींच्या व्यक्तींसाठी हे राशी परिवर्तन भाग्यशाली ठरणार आहे. सूर्य तुमच्या राशीत ११ व्या स्थानात असेल. याला लाभाचे स्थान म्हणतात. याचाच अर्थ सूर्याचे हे राशी परिवर्तन या राशींच्या लोकांसाठी आर्थिक फायदा देणारं ठरणार आहे. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. मान सन्मानात वाढ होईल. करिअरमध्ये यश मिळेल. जर तुमचे प्रमोशन अडकले असेल तर ते आताच होईल.
-
कन्या राशी : सूर्य तुमच्या राशीतून दहाव्या घरात असेल. यामुळे तुमचा विवेक जागृत होईल. तुम्ही कोणत्याही स्थितीत निर्णय घेऊ शकाल. बेरोजगार लोकांना रोजगार प्राप्त होईल. तसेच जे आधीपासूनच नोकरी करत आहेत त्यांना आणखी प्रगती करण्याची संधी मिळेल. जे विद्यार्थी एखाद्या परिक्षेची तयारी करत असतील, त्यांच्यासाठी सुद्धा यशाचे योग बनत आहेत. वडिलांच्या तब्बेतीबाबत काळजी घ्या.
-
कुंभ राशी : कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे राशी परिवर्तन खूपच मंगलमय ठरणार आहे. सूर्याने तुमच्या पंचम भावात प्रवेश केला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना योग्य पद्धतीने व्यक्त कराल. तुमच्या जवळच्या लोकांसोबतचे नाते आणखी घट्ट होईल. नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा हा शोध पूर्ण होईल. वैवाहिक जीवन उत्तम राहील आणि करिअरमध्ये सुद्धा प्रगती होईल.
सूर्य राशी परिवर्तनामुळे ‘या’ राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस सुरू होतील, एक महिना असेल नशीबवान
सूर्य वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश केलाय. या राशीत ते जवळपास १६ जुलैपर्यंत राहतील. जेव्हा केव्हा कोणता ग्रह राशी बदल करतो, तर त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. या सूर्य राशी परिवर्तनामुळे नशीबवान ठरणाऱ्या राशीबद्दल जाणून घेऊया..
Web Title: Sun transit in gemini effect on four zodiac signs will be lucky they get good job wealth and success prp