-
प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला डासांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र पावसाळ्यात हा त्रास अधिकच वाढतो. (Photo : Pexels)
-
या त्रासापासून स्वतचा बचाव करण्यासाठी लोक मच्छर प्रतिबंधक, मॉस्किटो कॉइल आणि मच्छर मारण्याचे रॅकेट यासारख्या गोष्टींचा वापर करतात. (Photo : Pexels)
-
पावसाळ्यात डासांना पळवण्यात अपयश येते. अशावेळी डास चावल्यामुळे त्वचेला सूज येणे, खाज येणे, त्वचेचे संक्रमण यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (Photo : Pexels)
-
आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता. (Photo : Pexels)
-
विशेष म्हणजे हे घरगुती उपाय आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केला जाणार नाही. (Photo : Pexels)
-
डास चावल्यावर कडुलिंबाची पाने आणि मध यांचे मिश्रण लावल्याने आराम मिळतो. (Photo : Unsplash/Pixabay)
-
तुळस कोणत्याही प्रकारच्या परजीवी संसर्गावर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याची पाने बारीक करून पेस्ट लावल्याने आराम मिळतो. (Photo : Unsplash)
-
कोरफडीचा रस नैसर्गिक रोग प्रतिरोधक मानला जातो, त्यात वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. (Photo : Pexels)
-
डासांच्या चावण्याने जास्त त्रास होत असल्यास त्वचेवर लिंबाचा रस लावावा. तुम्हाला होत असलेला त्रास यामुळे कमी होईल. (Photo : Pixabay)
-
गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप हे अँटीहिस्टामाइन्सचे स्त्रोत आहे जे कीटकांच्या चाव्याव्दारे होणाऱ्या वेदना आणि अस्वस्थतेपासून आराम देते. (Photo : Unsplash)
-
डास चावल्यावर त्वचेवर नारळाचे तेल लावल्यास आराम मिळू शकतो. (Photo : Pexels)
-
त्वचेवर कांद्याचे तेल लावल्याने डासांचा त्रास दूर होतो. (Photo : Freepik)
-
डासांच्या त्रासावर पुदिन्याचे तेल गुणकारी ठरते. (Photo : Freepik)
-
या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी कापूरचे तेल उपयुक्त ठरू शकते. (Photo : Freepik)
-
येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo : Pexels)
Photos : डास चावल्यावर येणारी सूज, खाज आणि त्वचा संक्रमणापासून कशी मिळवायची सुटका? जाणून घ्या
पावसाळ्यात डासांना पळवण्यात अपयश येते. अशावेळी डास चावल्यामुळे त्वचेला सूज येणे, खाज येणे, त्वचेचे संक्रमण यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
Web Title: How to get rid of swelling itching and skin infections from mosquito bites find out pvp