-
तुम्ही अनेकदा लोकांना घरात सजावट आणि इतर वस्तू ठेवताना पाहिलं असेल. घरात ठेवलेल्या या वस्तू तुमचे नशीब बदलू शकतात. आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तू सांगणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार त्यांना घरात ठेवल्याने तुमचे नशीब उजळेल.
-
घरात शंख ठेवणे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते. त्याचा आवाज आजूबाजूला सकारात्मकता आणतो. ज्या घरात शंख ठेवला जातो त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते.
-
नारळाला श्रीफळ असेही म्हणतात, त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. नारळ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार याची नियमित पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
-
वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य आणि दक्षिण पश्चिम दिशा पृथ्वी तत्वाशी संबंधित आहेत. घरामध्ये या दिशेला मातीपासून बनवलेल्या वस्तू ठेवल्यास ते खूप शुभ मानले जाते. असे केल्याने घरात शांतता राहते.
-
वास्तुशास्त्रानुसार सिंहाची मूर्ती घराच्या पूर्व दिशेला ठेवल्याने घरात समृद्धी येते. पितळेची सिंहाची मूर्ती नेहमी घरात ठेवावी. तसेच मूर्तीचे मुख घराच्या मुख्य दरवाजाकडे असावे.
-
लाफिंग बुद्धा घरात ठेवणे देखील चांगले मानले जाते. बाजारात तुम्हाला लाफिंग बुद्धाचे विविध प्रकार पाहायला मिळतात. जर तुम्ही तुमच्या घरात पैशाची कमतरता किंवा पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त असाल तर तुम्ही धनाची पेटी घेतलेले लाफिंग बुद्धा घरात ठेवा. ती विकत घेऊन आणू नये, असा समज आहे. एखाद्याकडून भेटवस्तू मिळाल्यावरच ते घरात ठेवणे शुभ असते. (ALL PHOTO: FREEPIK)
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या ‘या’ वस्तू तुमच्या नशीबाचे दरवाजे उघडतील
आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तू सांगणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार त्यांना घरात ठेवल्याने तुमचे नशीब उजळेल.
Web Title: Vastu shastra these things keep in the house will change your luck astro tips prp