-
आल्यामध्ये अनेक गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आयुर्वेदात त्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. आले आणि दूध एकत्र करून पिल्याने पावसाळ्यात या आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
-
रोगप्रतिकारशक्ती वाढेल: करोनाच्या काळात लोक औषधी वनस्पती म्हणून आल्यासारख्या गोष्टी वापरत होते. या काळात आल्याचा काढा पिण्याचा सल्ला दिला जात होता. आल्याचे दूध रोज प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते.
-
पचनसंस्था: आल्यामधील बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म पचनसंस्था सुधारण्यासाठी काम करतात. रात्री झोपण्यापूर्वी दुधात अद्रक टाकून त्याचे सेवन केल्यास सकाळी पोटही चांगले साफ होते. पचनक्रिया चांगली असेल तर शरीरातील सर्व समस्याही दूर होतात.
-
सर्दी: पावसाळ्यात लोकांना खोकला किंवा सर्दी यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अँटिबायोटिक्स घेतल्याने तुम्ही बरे होतात, पण त्यांचा किडनीवर वाईट परिणाम होतो. त्याऐवजी आल्याच्या दुधासारखे घरगुती उपाय वापरून पाहा.
-
आल्याचे तुकडे पाण्याने धुवून घ्या. आल्याचे लहान लहान तुकडे करा. एका पातेल्यात दूध गरम करा.
-
जेव्हा दूध उकळण्यास सुरुवात होईल तेव्हा त्यात आल्याचे तुकडे टाकून काही वेळ दूध उकळा.
-
यामुळे आल्याचा अर्क दुधात येईल. यानंतर दूध गाळून घ्या. कोमट दूध असल्यास ते पिऊन टाका.
-
जेव्हा बद्धकोष्ठता, गॅस अथवा अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आले आणि दुधाचे मिश्रण प्यायल्याने खूप फायदा होतो. आल्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
-
घश्यात खवखव खूप होत असेल तर आल्याचे दूध प्यायल्याने खूपसारे फायदे होतात. यामुळे घश्यात होणारी खवखव दूर होते. घश्यात खवखव होत असेल रात्री झोपण्याआधी आल्याचे दूध प्यावे. यामुळे फायदा होतो. यानंतर तासभर पाणी पिऊ नये.(All Photos : Freepik)
आल्याचं दूध रोज प्या, पावसाळ्यात ‘हा’ त्रास होणार नाही!
आले आणि दूध एकत्र करून पिल्याने पावसाळ्यात या आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Web Title: Ginger milk is best treatment of these monsoon health problems prp