-
पिंपलच्या त्रासाने आज दर- दुसरी व्यक्ती त्रस्त आहे. अनेकदा त्वचेचा आजारांसाठी खाण्यापिण्याच्या सवयींना कारण ठरवले जाते. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
तुमचा आहार महत्त्वाचा आहेच मात्र त्यासोबत आणखी काही गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. या सवयी कोणत्या हे आज आपण जाणून घेणार आहोत.. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
तुम्ही अंग पुसता त्याच टॉवेलने चेहरा पुसणे शक्यतो टाळा. तसेच हा टॉवेल फॅब्रिक सॉफ्टनर किंवा तत्सम साबणाने स्वच्छ करा. फॅब्रिक निवडताना सुद्धा मऊ कॉटन निवडा. ओला टॉवेल वापरणे सुद्धा टाळा. (फोटो: Pixabay)
-
करोना काळात मास्क लावण्याची सवय आपल्याला गरजेची होती, अजूनही आपण मास्क वापरत असाल तर मास्कचे फॅब्रिक योग्य असेल याची खात्री करा. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
तुम्ही ओढणी, रुमाल, स्कार्फ बांधत असाल तर वेळोवेळी धूत जा. उन्हात सुकवून मगच चेहऱ्यावर वापर करा. (फोटो: Pixabay)
-
तुमच्या बेडशीटमुळे सुद्धा पिंपलचा धोका निर्माण होऊ शकतो. तुमची चादर व उशांची कव्हर वेळोवेळी स्वच्छ करत जा. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
तुमच्या केसांच्या बटा सतत चेहऱ्यावर येत असतील तरी पिंपल होऊ शकतात. केसाची उत्पादने, अगदी तेल सुद्धा त्वचेवर सतत लागल्यास पिंपल येऊ शकतात. त्यामुळे केस चेहऱ्यावर सतत येणार नाहीत अशी हेअर स्टाईल निवडा. (फोटो: Pixabay)
-
आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुण्याची सवय ठेवा, ज्यामुळे केस चेहऱ्यावर आल्यास पिंपलचा धोका कमी होईल.(फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे आहाराकडे सुद्धा लक्ष द्या. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. पोट स्वच्छ असल्यास पिंपल्सचा त्रास कमी होतो.(फोटो: इंडियन एक्सप्रेस)
Skin Acne Problem: चेहऱ्यावर सतत पिंपलचा त्रास? आहारच नव्हे तर ‘या’ सवयी सुद्धा ठरतात कारण
Skin Acne Problems: तुमच्या आहारासोबत काही गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. या सवयी कोणत्या हे आज आपण जाणून घेणार आहोत..
Web Title: Skin acne problem change these habits to get rid of pimples skin care routine home remedies svs