Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why you should never drink tea on an empty stomach scsg

Photos: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; उद्भवू शकतात आरोग्याच्या ‘या’ समस्या

चयापचय क्रियेसही चहा पूरक आहे. परंतु, दररोज सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याचसंदर्भात जाणून घेऊयात…

Updated: August 24, 2022 17:51 IST
Follow Us
  • Why you should never drink tea on an empty stomach
    1/24

    भारतात दिवसाची सुरुवात सकाळी चहाने बहुसंख्य करतात. दिवसाची सुरुवात चहाने न करण्याची कल्पनाच बहुतेकांना करवत नाही.

  • 2/24

    चहा हे पेय भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे.

  • 3/24

    परंतु दिवसा रिकाम्या पोटाने चहा पिणे हितकारक की अहितकारक, याविषयी आहारतज्ज्ञांची काही मते आहेत.

  • 4/24

    या आहारतज्ज्ञांच्या मते चहाने तरतरी येते. त्यातील ऑक्सिडीकरण विरोधी घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी मदत होते.

  • 5/24

    चयापचय क्रियेसही चहा पूरक आहे. परंतु, दररोज सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आपले पोट बिघडू शकते.

  • 6/24

    रोज रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटात आम्लवृद्धी होते. त्याचा पचनावर दुष्परिणाम होतो.

  • 7/24

    तज्ज्ञांच्या मते सकाळी मोकळ्या पोटी चहा प्यायल्याने खालील दुष्परिणाम होऊ शकतात.

  • 8/24

    डोकेदुखी : आपली डोकेदुखी घालवण्यासाठी कधी काही जण रिकाम्या पोटी चहा घेतात. वास्तविक त्यामुळेच त्यांची डोकेदुखी वाढू शकते.

  • 9/24

    चहातील ‘कॅफिन’ या घटकामुळे तसे होते. झोपेआधी योग्य काळ आधी योग्य प्रमाणात पाणी पिणे त्यासाठी हितकारक ठरते.

  • 10/24

    भारतात दिवसाची सुरुवात सकाळी चहाने बहुसंख्य करतात. दिवसाची सुरुवात चहाने न करण्याची कल्पनाच बहुतेकांना करवत नाही.

  • 11/24

    अपचन आणि निर्जलीकरण : रिकाम्या पोटी चहा घेतल्याने आपल्या पचनसंस्थेत वातवृद्धी (गॅसची वाढ) होते.

  • चहामुळे मूत्रवृद्धी होते. सकाळी चहा घेतल्यावर आपल्याला जास्त वेळा लघवीला जावे लागते
  • 12/24

    त्यानंतर पुरेसे पाणी न प्यायल्यास निर्जलीकरणाची जोखीम वाढते. रात्रभर काही तास झोपल्याने आपल्या शरीरात आधीच निर्जलीकरण झालेले असते. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा चहा प्यायल्याने हे निर्जलीकरण वाढते.

  • 13/24

    चहामध्ये ‘थिओफिलिन’ हा रासायनिक घटक असतो. त्याचा आपल्या विष्ठेवर परिणाम होऊन बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते.

  • 14/24

    पोषक तत्त्वांचे शोषण रोखते : चहामध्ये असलेला ‘टॅनिन’ घटक अन्नातून लोह शोषण्यास अडथळा आणतो.

  • चहामधील ‘कॅफिन’ पोषक तत्त्वांचे शोषण कमी करू शकते.
  • 15/24

    आम्लपित्त वृद्धी : रिकाम्या पोटी चहा घेतल्याने आपल्या पोटातील आम्ल आणि अल्क धर्मीय द्रवांचा समतोल बिघडतो.

  • 16/24

    हा समतोल बिघडल्याने आम्लपित्त वृद्धी (अ‍ॅसिडिटी) होते.

  • 17/24

    छातीच्या खालच्या भागात वेदना जाणवू शकतात, जळजळ होते. पोटात चहा गेल्याने हा त्रास होऊ शकतो.

  • 18/24

    त्यामुळे आहारतज्ज्ञ सांगतात, की आपल्या नाश्त्याबरोबर चहा घ्यावा. चहात साखरेऐवजी गुळाचा वापर करावा.

  • 19/24

    असं केल्याने जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आदी क्षार मिळण्यास मदत होते.

  • 20/24

    पचनक्षमतेतही त्यामुळे वृद्धी होते.

  • 21/24

    सकाळी उठल्यावर पेलाभर कोमट पाणी नियमित प्यायल्यास निरोगी राहण्यास मदत होते.

  • 22/24

    खरे तर तज्ज्ञांच्या मते चहा पिण्याची आदर्श वेळ दुपारी तीन वाजताची आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि फ्लू-सर्दी टळू शकते.

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Why you should never drink tea on an empty stomach scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.