• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. switch board cleaning tips how to clean electric switch board prp

Switch Board Cleaning Tips: काळा पडलेला स्विच बोर्ड साफ करताना भीती वाटते? मग या टिप्स वापरा

तुम्ही स्विच बोर्डवरील कोणत्याही प्रकारचे डाग अगदी सहजपणे साफ करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

September 7, 2022 18:19 IST
Follow Us
  • How To Clean Electrical Switches and Board: बरेच लोक विजेचे स्विच आणि स्विच बोर्ड साफ करण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे घरातील विजेचे स्विच आणि बोर्ड इतके काळे पडतात की अतिशय घाणेरडे दिसतात.
    1/12

    How To Clean Electrical Switches and Board: बरेच लोक विजेचे स्विच आणि स्विच बोर्ड साफ करण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे घरातील विजेचे स्विच आणि बोर्ड इतके काळे पडतात की अतिशय घाणेरडे दिसतात.

  • 2/12

    स्विच बोर्ड साफ करताना विजेच्या धक्क्याची भीती वाटत असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही स्विच बोर्डवरील कोणत्याही प्रकारचे डाग अगदी सहजपणे साफ करू शकता. कसे ते जाणून घेऊया.

  • 3/12

    एकाच महिन्यात सर्व सण एकत्र येणार आहेत. दसरा आणि दिवाळी. हे सण जवळ आले की घरात आनंददायी वातावरण तयार होत असतं. परंतु घराच्या साफसफाईचं मोठं टेन्शन असतं. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील सर्व स्विच बोर्ड स्वच्छ करणे.

  • 4/12

    काळे झालेले स्विच बोर्ड साफ करण्यापूर्वी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वीजपुरवठा बंद करा. अन्यथा तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो. घरातील इतर सदस्यांनाही वीजपुरवठा बंद करण्याबाबत माहिती द्या, जेणेकरून साफसफाई करताना चुकूनही वीज चालू केली जाणार नाही.

  • 5/12

    दात स्वच्छ करण्याव्यतिरिक्त, टूथपेस्टचा वापर इतर अनेक गोष्टी स्वच्छ करण्यासाठी केला जातो. तुम्ही टूथपेस्टचा वापर स्विच बोर्ड साफ करण्यासाठी देखील करू शकता. टूथपेस्ट स्विच बोर्डवरील डाग आणि घाण पूर्णपणे साफ करू शकते.

  • 6/12

    बोरॅक्स पावडर ही पावडर तुम्ही हार्डवेअरच्या दुकानातून खरेदी करू शकता. एका भांड्यात ३ चमचे ही पावडर घ्या. आता त्यात लिंबाचा रस आणि पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा.

  • 7/12

    ही पेस्ट स्विच बोर्डवर लावा आणि १० मिनिटे राहू द्या. त्यानंतर ब्रशच्या मदतीने स्विच बोर्ड स्वच्छ करा. नंतर कापडाने पुसून टाका.

  • 8/12

    बोरॅक्स पावडर आणि व्हिनेगर देखील वापरू शकता: यासाठी एका भांड्यात बोरॅक्स पावडर आणि व्हिनेगर एकत्र करून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट स्वीच बोर्डवर लावून काही वेळ ठेवून कापडाने पुसुन टाका.

  • 9/12

    तुम्ही स्विच बोर्ड पॉलिश करण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरू शकता.

  • 10/12

    नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने सुद्धा स्विच बोर्ड सहजपणे पॉलिश केले जाऊ शकते. याशिवाय, स्वीच बोर्डची घाण काढण्यासाठी अल्कोहोलचा वापर देखील खूप प्रभावी आहे.

  • 11/12

    लक्षात ठेवा की स्विच बोर्ड साफ केल्यानंतर अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा चालू करा. त्यामुळे घरात विद्युत प्रवाह पसरण्याची भीती आहे. त्यामुळे स्वीच बोर्ड साफ केल्यानंतर ३०-४० मिनिटे बोर्ड चालू करणे टाळा आणि बोर्ड सुकल्यावरच चालू करा.

  • 12/12

    सुरक्षिततेसह स्विच बोर्ड स्वच्छ करण्याच्या या टिप्स नक्की वापरा. यामुळे तुम्ही कोणताही धोका न घेता स्विच बोर्ड अगदी नवीन असल्यासारखा चमकवू शकता. (All Photos : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Switch board cleaning tips how to clean electric switch board prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.