-
बुध ग्रह स्वतःच्या कन्या राशीत प्रतिगामी आहे. १० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान बुध वक्री अवस्थेत राहील. त्यानंतर ते पुन्हा मार्गी लागेल. यानंतर २६ ऑक्टोबरला बुध तूळ राशीत प्रवेश करेल. जाणून घ्या वक्री बुध कोणत्या राशींचे चमकवेल भाग्य.
-
वृषभ- बुध तुमच्या राशीच्या पाचव्या भावात भ्रमण करत आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. संतती सुखाचे योग बनतील. विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ राहील.
-
मिथुन- तुमच्या राशीच्या चौथ्या घरात बुधाचे प्रतिगामी होणे लाभदायक ठरेल. या काळात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील.
-
वृश्चिक- तुमच्या राशीच्या अकराव्या घरात बुधाचे प्रतिगामी होणे लाभदायक मानले जाते. या काळात कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील.
-
धनु- तुमच्या राशीच्या दहाव्या घरात बुधाचे स्थान शुभ राहणार आहे. या काळात तुम्हाला नोकरीत बढती मिळू शकते. मात्र, बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
-
मकर- तुमच्या राशीच्या नवव्या घरातील बुधाचे स्थान लाभदायक ठरणार आहे. कोर्ट केसेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल.(सर्व फोटो: संग्रहित फोटो)
२ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ ५ राशी असतील भाग्यशाली; जाणून घ्या तुमच्या राशीचा यात समावेश आहे की नाही
प्रतिगामी बुध अनेक राशींसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. प्रतिगामी बुधाच्या काळात काही राशींना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. जाणून घ्या कोणत्या राशी असतील…
Web Title: Vakri budh 2022 by october 2 these 5 zodiac signs will be lucky is your zodiac included in the list gps