-
तळलेले पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. खवय्ये मंडळी तर तळलेले चविष्ट पदार्थ खाण्यासाठी एका पायावर तयार असतात.
-
सणांमध्ये प्रत्येक घरात खाद्यपदार्थांची मेजवानी असते. त्यात तळलेल्या पदार्थांचा समावेश हमखास केला जातो. पण कधीकधी तळलेले पदार्थ बनवताना यामुळे तब्येत तर बिघडणार नाही ना असा प्रश्न पडतो.
-
काही जण तर या भीतीने आवडीच्या तळलेल्या पदार्थांचा त्याग करतात.
-
यावरील उपाय म्हणजे तळलेले पदार्थ बनवताना जर काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या, तर तळलेले पदार्थ खाल्ल्याने तब्येत बिघडणार नाही.
-
कोणत्या टिप्स वापरल्याने तुम्ही चिंतामुक्त होऊन तळलेले पदार्थ खाऊ शकता जाणून घ्या.
-
ताजे तेल वापरावे : घरात जेव्हा तळलेले खाद्यपदार्थ बनवले जातात, तेव्हा सतत त्याच तेलाचा वापर केला जातो. सणांच्या दिवसात तुम्ही असे पाहिले असेल किंवा स्वतः करत असाल. कारण तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात आणि त्यासाठी वापरलेल्या तेलाचा नवीन काही तळण्यासाठी वापर केला जातो.
-
तज्ञांच्या मते आरोग्यासाठी हे चांगले नसते. सतत तेच तेल वापरण्यासाठी गरम केल्याने तेलाची पौष्टिकता कमी होते तसेच अशाप्रकारे बनवलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने अपचनाची समस्या देखील उद्भवू शकते.
-
बेकिंग सोडा : तळलेले पदार्थ पौष्टिक करण्याची एक सोपी युक्ती म्हणजे त्यात बेकिंग सोडा मिसळा. बेकिंग सोडा पिठात मिसळल्याने बुडबुडयांच्या स्वरूपात गॅस बाहेर पडतो आणि त्यामुळे तेल कमी शोषले जाते.
-
तेल जास्त वेळ गरम होण्यासाठी ठेऊ नका : तळलेले पदार्थ बनवण्यासाठी तेलाचे ३२५°F-४००°F तापमान सर्वोत्तम आहे. तेलाचे तापमान नियंत्रित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वयंपाकघरातील थर्मामीटरमध्ये गुंतवणूक करा. जास्त गरम तेलात अन्नपदार्थ तळू नका.
-
पौष्टिक तेलाचा वापर : तळलेले पदार्थ बनवण्यासाठी नेहमी रिफाइंड तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल वापरा. हे रिफाइंड तेलापेक्षा खूप पौष्टिक असते.
-
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)
-
(सर्व फोटो सौजन्य : Pexels)
Cooking Hack : जेवण बनवताना फक्त ‘या’ टिप्स वापरा; तळलेले पदार्थसुद्धा खाता येणार मनसोक्त
तळलेले पदार्थ बनवताना जर काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या, तर असे पदार्थ खाल्ल्याने तब्येत बिघडणार नाही.
Web Title: Worried about oily food use these cooking hack will help to make fried items more healthier pns